महादेवाच्या नंदीच्या कानात चंद्रकांत पाटलांनी काय मागणं मागितलं ?

महादेवाच्या नंदीच्या कानात चंद्रकांत पाटलांनी काय मागणं मागितलं ?

बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी नंदीच्या कानात मागणं मागितलं. पाटलांनी महादेवाच्या नंदीच्या कानात नेमकं काय मागणं मागितलं या याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 09 एप्रिल : बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल मैदानात आहेत. भाजपाच्या कुल यांच्या प्रचाराकरीता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकला. यावेळी बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी नंदीच्या कानात मागणं मागितलं. पाटलांनी महादेवाच्या नंदीच्या कानात नेमकं काय मागणं मागितलं या याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते मंदिर किंवा दर्ग्यात जाताना पाहायला मिळत आहेत. याच मंदिरात 5 दिवसांपूर्वी बारामतीच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांनी अभिषेक करून दर्शन घेतलं. त्यावेळी झालं असं की, कांचन यांच्या कपाळावर बेलपत्र चिटकलं.  हे त्यांना माहीत नव्हतं पण, हे कुल यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बारामतीकरांचा हा ग्रीन सिग्नल आहे असं सांगितले होतं.

त्यामुळे आता हा सिद्धेश्वराचा कौल कांचन कुल यांना मिळाल्यानं 'थांबायचं नाही तर लढायचं' अशी भावना कुल यांनी व्यक्त केली. चक्क  महादेवाने कौल दिला आहे असx म्हंटल्यावर चंद्रकांत पाटीलही मागे राहिले नाहीत. याची बातमी परिसरात पसरली आणि चंद्रकांत पाटील यांनी याच मंदिरातील सिध्देश्वराच्या समोर असणाऱ्या नंदीच्या कानात आपल मागणं मागितलं.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सत्तेच्या काळात राम मंदिराच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं असले तरी निवडणूक काळात मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात झाली असून चंद्रकांत पाटील यांनी नंदीच्या कानात मोदींच्या पंतप्रधान पदाची मागणी केली की स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बारामतीच्या सिध्देश्वराचा नंदी, बारामतीकरांची मागणी मान्य करणार की चंद्रकांतदादांची मागणी मान्य करणार हे निवडणूक निकालानंतरच कळेल. मात्र, अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याने जाहीर अंधश्रद्धा पसरवणं योग्य आहे का असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या सगळ्याला बारामतीकर कसं घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.


VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणा यांचा दिवस 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या