'हिम्मत असेल तर...' चंद्रकांत पाटलांचं पवार आणि अशोक चव्हाणांना खुलं आव्हान

'हिम्मत असेल तर...' चंद्रकांत पाटलांचं पवार आणि अशोक चव्हाणांना खुलं आव्हान

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढू देत. कुणाचे आमदार जास्त येतील याचं वेगळें भविष्य सांगण्याची गरज नाही नसल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • Share this:

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 02 जानेवारी : 'हिंमत असेल तर वेगवेगळे लढा' असं खुलं आव्हान महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी शरद पवार, अशोक चव्हाण यांना दिलं आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढू देत. कुणाचे आमदार जास्त येतील याचं वेगळें भविष्य सांगण्याची गरज नाही नसल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

"केवळ राज्यातमध्ये युतीचं सरकार टिकाव म्हणून मुंबईत भाजपचा महापौर झाला नाही. नाहीतर भाजपचा महापौर झाला असता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव एकमेकांकडे बघायचे पण नाहीच पण आता मोदीच्या भीतीने एकत्र येतात" असं वक्तव्य चंद्रकांता पाटील यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

"गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या लढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आता आपण जर वेगवेगळे लढलो तर मरणार, पाच वर्षाचे जे काही शिल्लक राहिले तेही राहणार नाही असं त्यां दोन्ही पक्षांना वाटतं आहे." असंही ते म्हणाले तर  'सर्व विरोधी पक्षांना भाजपची भीती वाटू लागली आहे.' असं विधानही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

सांगलीतील एका भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. कितीही भांडण असली तरी बाकीच्या पक्षांना एकत्र येऊन लढावं लागतं यातच भाजपचा विजय आहे' असेही पाटील म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. 'तीन राज्यांमध्ये आमचा पराभव झाला असं सांगितलं जातं. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस विजयी झाली. पण पूर्ण राज्यात काँग्रेसपेक्षा 1 लाख 50 हजार मते ही भाजपला मिळाली. 5 आमदारांचा फरक पडला त्यातील 2 आमदार हे एक-एक मताने गेले आणि एकूण 11 आमदार दहापेक्षा कमी मतांनी केले याला काय पराभव म्हणायचा का?' असा सवाल करत लोकशाहीमध्ये जी रचना आहे ती आम्ही स्वीकारली आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, 'राजस्थानमध्ये पॉईंट चार पर्सेंट मते कमी पडल्यामुळे आमच्या या 22 जागा गेल्या. छत्तीसगडमधला पराभव मोठा आहे, हे मला मान्य आहे. पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विजय मिळाल्या मिळाल्या देशातल्या,  महाराष्ट्रातल्या लोकांना आता मोदीचं सरकार गेलं, भाजप सरकार गेलं. त्यामुळे आता आपलं राज्य येणार अशी स्वप्नन पडू लागली. पण मागील साडेचार वर्षात महाराष्ट्रात आम्ही एकही निवडणूक हरलो नाही. मुंबईत सुद्धा आमचाच विजय झाला आणि केवळ राज्यामध्ये युतीचं सरकार टिकाव म्हणून मुंबईत भाजपचा महापौर झाला नाही, नाहीतर 'यू'भाजपचा महापौर झाला असता' असं ही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

CCTV : कारने तरुणीला हवेत उडवलं, झाडावर आदळल्याने सायली कोमात

First published: January 2, 2019, 7:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading