राज्यपालांच्या भेटीनंतरही भाजपचा सत्तेवर दावा नाही, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?

राज्यपालांच्या भेटीनंतरही भाजपचा सत्तेवर दावा नाही, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?

भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेला खीळ बसली आहे. पण महायुतीचं सरकार लवकरच लागू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : महाराष्ट्रात आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून भाजप सत्तेचा तिढा सोडवेल अशा अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र, राज्यपालांच्या बैठीक भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा प्रश्न अद्याप कायम आहे. भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापनेला खीळ बसली आहे. पण महायुतीचं सरकार लवकरच लागू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. खरंतर शिवसेना आणि भाजप त्यांच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. त्यामुळे अद्याप सत्तेवर काहीही तोडगा नाही. अशात राज्यात राष्ट्रपती राजपट लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे.

सराकर स्थापन करण्यासाठी महायुतीला स्पष्ट जनादेश देण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांशी कायदेशी मुद्द्यांवर चर्चा झाली असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे. त्यावर सध्याची स्थिती पाहता दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असं सांगितलं तर मला स्वतःहून युती तोडायची नाही. त्यामुळे भाजपने काय तो निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्तेसाठी सुरू असलेला वाद अद्याप मिटला नाही तर तो वाढला असंच म्हणावं लागेल.

राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा नाही

-सरकार चालवण्यासाठी महायुतीला कौल

-आज राज्यपालांशी कायदेशीर बाबींबर चर्चा केली

-राजकीय स्थितिबद्दल राज्यपालांना माहिती दिल

-राज्यपालांशी चर्चा झाली, पुढे काय कराचयं ठरवू

-सरकार स्थापनेसाठी सामान्य पेक्षा जास्त वेळ

शिवसेना आमदारांनी काय घेतली भूमिका?

'सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असेल,' असा एका ओळीचा ठराव या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेना मुख्यमंत्रिपदच मिळावं, या मागणीबाबत सर्व आमदारांचं एकमत झालं आहे.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंद असेल,' असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही मातोश्रीच्या आदेशाचे भुकेलेलो आहोत, असं म्हणत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच या बैठकीनंतर सर्व शिवसेना आमदारांना रंगशारदा हॉटेल इथं जाण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळातही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आक्रमकच राहणार अशी स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 02:53 PM IST

ताज्या बातम्या