आई-वडील की राक्षस, नवजात बाळाला कमोडमध्ये घालून फेकलं ट्रेनच्या टॉयलेटमध्ये

आई-वडील की राक्षस, नवजात बाळाला कमोडमध्ये घालून फेकलं ट्रेनच्या टॉयलेटमध्ये

रविवारी हावडा मेल अमृतसर पोहचली. तेव्हा ट्रेन खाली झाल्यानंतर कर्मचारी ट्रेनची सफाई करत होते. जेव्हा त्यांनी एसी D-3 डब्ब्याचं शौचालया खोललं तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.

  • Share this:

अमृतसर, 24 डिसेंबर : हावडाहून अमृतसर पोहचलेल्या ट्रेनमध्ये सफाई सुरू असताना कर्मचाऱ्यांना गाडीच्या एका कोचच्या टॉयलेटमध्ये एक नवजात बाळ आढळलं. ज्याला ओढणीने लपटून कमोडमध्ये टाकून फेकून देण्यात आलं होतं. हे वाचल्यानंतर तुमचा संताप उडाल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळं खरं आहे. या संपूर्ण घटनेमुळे पंजाब परिसर हादरून गेला आहे.

ही घटना पाहताच याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर तात्काळ बाळाला कमोडमधून बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी हावडा मेल अमृतसर पोहचली. तेव्हा ट्रेन खाली झाल्यानंतर कर्मचारी ट्रेनची सफाई करत होते. जेव्हा त्यांनी एसी D-3 डब्ब्याचं शौचालया खोललं तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे ओढणीमध्ये गुंडाळलेलं हे नवजात बाळ फ्लशमध्ये अडकलं होतं. सफाई कर्मचाऱ्यांनी इंचार्ज गुमनाम सिंह याला बोलवलं. बाळाला बाहेर काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाळाला आधी कमोडमध्ये टाकण्यात आलं आणि त्यानंतर त्याला ओढणीमध्ये गुंडाळण्यात आलं होतं.

जेव्हा बाळाला कमोडमधून बाहेर काढण्यात आलं तेव्हा बाळाचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पोलीस आता या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करणार आहेत.

दरम्यान, असं कृत्य करणारे आई-वडिल की हैवान असा प्रश्न उभा राहतो. या संपूर्ण प्रकाराचा पोलीस आता कसून तपास करत आहेत.

VIDEO : याला काळीज नसावच, आधी गाडीने दांपत्याला उडवलं, नंतर पळून जाताना पुन्हा चाकाखाली चिरडून निघून गेला

First published: December 24, 2018, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading