राम रहिमच्या सर्थकाची जेलमध्ये हत्या, कैद्यांनी लोखंडी रॉडने केला हल्ला

डेरा सच्चा सौदाचा समर्थक महिंद्रपाल सिंह उर्फ बिट्टूची काही कैद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर मोहिंद्रपाल बिट्टूची हत्या करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 09:52 PM IST

राम रहिमच्या सर्थकाची जेलमध्ये हत्या, कैद्यांनी लोखंडी रॉडने केला हल्ला

पंजाब, 22 जून : पंजाबच्या नाभामधील तरुंगात बंद असलेला डेरा सच्चा सौदाचा समर्थक महिंद्रपाल सिंह उर्फ बिट्टूची काही कैद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर मोहिंद्रपाल बिट्टूची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बिट्टूचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणात ज्यांनी बिट्टूची हत्या केली त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर तरुंगात असताना अशा पद्धतीने बिट्टूची हत्या झाल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करत आहे.

गुरु ग्रंथ साहिबच्या अपमान केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी

2015 मध्ये पंजाबच्या बरगाडी इथे गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याच्या प्रकणात बिट्टू मुख्य आरोपी आहे. त्याला नाभा उच्च सुरक्षा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. बिट्टू कायदेशीर गुन्हा सुरू होता. हत्येआधी नाभाच्या न्यायिक ताब्यात जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

लोखंडाच्या ऱॉडने केला हल्ला....

Loading...

जेलमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट्टूवर जेलमधील दोन कैद्यांनी हल्ला केला. जेलमध्ये चालू असलेल्या कामात पडलेल्या लोखंडाच्या रॉडने कैद्यांनी बिट्टूवर हल्ला केला. त्यानंतर बिट्टूला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण उपचारादरम्यान, बिट्टूचा मृत्यू झाला.

लोखंडाने हल्ला झाल्यामुळे बिट्टू मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. तर पोलिसांनी आता या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे.

SPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...