Home /News /news /

OMG! सहा मित्रांनी एकाच पार्टीत रिचवली 17 लाखांची दारु, चौकशी सुरु

OMG! सहा मित्रांनी एकाच पार्टीत रिचवली 17 लाखांची दारु, चौकशी सुरु

या पार्टीत एकूण सहा पाहुणे सहभागी झाले होते. जवळपास रात्री 2 वाजेपर्यंत ही पार्टी सुरु होती. पार्टीच्या शेवटी बिल आलं आणि यजमान NRI ची सर्व नशा खाडकन उतरली.

    चंदीगड, 19 डिसेंबर: ख्रिसमस (Christmas) आणि न्यू ईयर (New Year) चे वेध सध्या सर्वांना लागले आहेत. थंडीच्या दिवसात एकत्र पार्टी करण्यासाठी निमित्त शोधणाऱ्या मित्रांना ही दोन मोठी कारणं आहेत. मित्रांची पार्टी म्हंटलं की त्यात खाण्याच्या आणि पिण्याची चंगळ ही आलीच. मात्र, सहा मित्रांनी हॉटेलमध्ये केलेल्या एका पार्टीचं बिल हे तब्बल 20 लाख रुपये इतकं आलं आहे. त्यामधील पुढची धक्कादायक बाब म्हणजे या सर्व मित्रांनी यामध्ये तब्बल 17 लाखांची दारु रिचवली आहे. काय आहे प्रकरण? चंदीगडमध्ये (Chandigarh) एका NRI व्यक्तींने मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी दिली. या पार्टीत एकूण सहा पाहुणे सहभागी झाले होते. जवळपास रात्री 2 वाजेपर्यंत ही पार्टी सुरु होती. पार्टीच्या शेवटी बिल आलं आणि यजमान NRI ची सर्व नशा खाडकन उतरली. या पार्टीचं एकूण बिल 19 लाख 84 हजार इतके आले होते. त्यापैकी फक्त दारुचं बिल हे 17 लाख 31 हजार रुपये इतकं आहे. या भरमासाठ बिलानं हादरलेल्या NRI नं या प्रकरणाची पोलीस आणि अबकारी कर विभागाकडं (Excise and Taxation Department) तक्रार केली आहे. आता अबकारी विभागानं क्लबच्या सर्व सहा मालकांना नोटीस बजावली आहे. तर पोलिसांनी जिल्हाधिकारी (D.C.) यांच्या आदेशाचं उल्लंघन करत रात्री 2 वाजेपर्यंत क्लब सुरु ठेवण्याचा गुन्हा मालकांवर दाखल केला आहे. हे वाचा-Amazon ने तयार केली अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार; या गाडीला स्टिअरिंग नाही या क्लब मालकांना देण्यात आलेल्या नोटीशीमध्ये वाईन आणि शॅम्पेन सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘बारमधील सर्व दारुचे प्रकार कुठून खरेदी केले?’ हा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर या सर्व मालकांना आता अबकारी आणि कर विभागाच्या संचलाकांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या