1 कोटी जिंकण्याची मोठी संधी! TikTok बंदीनंतर या कंपनीने सुरू केला भन्नाट शो

1 कोटी जिंकण्याची मोठी संधी! TikTok बंदीनंतर या कंपनीने सुरू केला भन्नाट शो

भारतात TikTok वर बंदी घातल्यानंतर चिंगारी हा अ‍ॅप भारतात दर तासाला सुमारे 1 लाख वेळा डाऊनलोड केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जुलै : भारतात TikTok वर बंदी आल्यानंतर भारतीय शॉर्ट व्हिडिओ अॅप Chingari ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात TikTok वर बंदी घातल्यानंतर चिंगारी हा अ‍ॅप भारतात दर तासाला सुमारे 1 लाख वेळा डाऊनलोड केला जात आहे आणि या अॅपवर दर तासाला 2 लाख व्यू मिळत आहे. सध्या या चिंगारी अॅपच्या डाऊनलोडची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. दरम्यान, चिंगारी या कंपनीने आता स्टार्स: टॅलेंटचा महासंग्राम (Chingari Stars: Talent Ka Mahasangram) नावाचा पहिला डिजिटल टॅलेंट हंट शो समोर आणला आहे.

1 कोटींचं मिळणार बक्षिस

या शोमध्ये जिंकणाऱ्या सर्वोत्कृष्ट कंटेंन्ट क्रिएटरला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यातील सर्वोत्कृष्ट कंटेंन्ट क्रिएटरला 5 लाख रुपये मिळतील. हा कार्यक्रम राज्य आणि राष्ट्रीय दोन स्तरांवर असणार आहे. या शो अंतर्गत, वापरकर्ते आपले व्हिडिओ डान्स, सिंगिंग, अॅक्टिंग, मिमिक्री, कॉमेडी आणि इनोव्हेशन करत आपले व्हिडिओ अपलोड करू शकतात. कोणीही या शोमध्ये भाग घेऊ शकतं. चिंगारी अॅपचे सहसंस्थापक सुमित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कलागुणांना वाव देणं हे कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.

येत्या 3 दिवसात या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

15 ते 60 सेकंदांचा व्हिडिओ करा अपलोड

कंपनीच्या म्हणण्यानुसार, शोमध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक भाग घेणाऱ्याला 15-60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. यानंतर, कंटेंन्टनुसार व्हिडिओ शॉर्ट-लिस्ट केले जाणार. चिंगारी अ‍ॅपमध्येच यासाठी थेट मतदान करण्यात येणार आहे. यानंतर, उत्तम आणि सगळ्यात जास्त मत मिळालेल्या सहभाग्याला चिंगारीकडून टॅलेंट का महासंग्राम अंतर्गत 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल.

महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद

मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ

असा घ्या शोमध्ये भाग

या शोमध्ये भाग घेण्यासाठी, सगळ्यात आधी मोबाइल फोनवर चिंगारी अॅप डाउनलोड करा आणि प्लॅटफॉर्मवर आपलं प्रोफाइल तयार करा. यानंतर, तुमची कॅटॅगरी निवडा. तुमचा कोणताही 15 ते 60 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करा. यानंतर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करावा लागेल. जो मार्केटिंगचा एक भाग आहे. यानंतर या व्हिडिओला लाईक मिळतील.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 17, 2020, 8:13 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या