S M L

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांच्यासमोर काय आहेत आव्हाने ?

नाशिक हे खरंतर मुंबई, पुण्याच्या पंक्तीतलं महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि याच नाशकाची धुरा आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंच्या हाती सोपवण्यात आलीय. जालना, सोलापूर, नवी मुंबई.... आणि पुण्यातल्या पीएमपीएमलच्या कारभारचा अनुभव असणाऱ्या मुंढेंना, आता नाशिक महापालिकेचे प्रश्नी मार्गी लावायचे आहेत

Chandrakant Funde | Updated On: Feb 8, 2018 06:30 PM IST

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांच्यासमोर काय आहेत आव्हाने ?

08 फेब्रुवारी, नाशिक : नाशिक हे खरंतर मुंबई, पुण्याच्या पंक्तीतलं महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि याच नाशकाची धुरा आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंच्या हाती सोपवण्यात आलीय. जालना, सोलापूर, नवी मुंबई.... आणि पुण्यातल्या पीएमपीएमलच्या कारभारचा अनुभव असणाऱ्या मुंढेंना, आता नाशिक महापालिकेचे प्रश्नी मार्गी लावायचे आहेत, पण सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध तुकाराम मुंढेंसाठी नेहमीच आडकाठी ठरलाय. पुणे, पिंपरी-चिंचवडप्रमाणेच नाशिकमध्येही भाजपचीच सत्ता आहे. सध्या नाशिकच्या राजकारणात आमदार विरूद्ध नगरसेक असा संघर्ष पाहायला मिळतोय. आणि या संघर्षाच्या कचाट्यात न अडकता, सर्वसामान्य नाशिककरांसाठी काम करण्याचं आव्हान तुकाराम मुंढे समोर असणार आहे. खरंतर नाशिकमध्ये पालिका आयुक्त म्हणून काम करताना तुकाराम मुंढे यांच्यासमोर रखडलेल्या कामांची भलीमोठी यादीच आहे. पण स्वतःला नाशिकचे राजकीय कैवारी म्हणवून घेणारे तुकाराम मुंढेंना किती सहकार्य करतात त्यावर नाशिकच्या विकासाचा वेग अवलंबून असेल असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.

नाशिकमध्ये पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांच्या समोरची आव्हाने

- स्मार्ट सिटी जाहीर झाल्यानं पालिकेस करोडोंचा निधी

- यात 257 कोटींच्या रस्त्याची कामं

- शहरात बसवण्याचा एलईडी प्रकल्प झालाय वादग्रस्त

Loading...

- सरकार नियुक्त कंपनीकडून खरेदी करता प्रत्येक नगरसेवकाची निधीची मागणी

- टेंडरनेच खरेदी झाली पाहिजे या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक

- गोदावरी नदीचा प्रदूषण प्रश्न गंभीर

- 'कपाट' प्रश्न आजही प्रलंबित असल्याने बांधकामांच्या परवानग्या रखडल्या

- पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढ या पालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध

- शहर बस सेवेचं भिजतं घोंगडं, पालिका बससेवा ताब्यात घेणार का ?

- आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गिते यांचा प्रस्तावित महिला रुग्णालयात वाद ऐरणीवर

- सभागृह नेता दिनकर पाटील यांचं प्रतिसरकार

नाशिक पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली आणि तुकाराम मुंडे घेणार त्यांचा पदभार या वृत्तानं नाशिक पालिकेचं वातावरण चांगलंच ढवळून निघालय. आपल्या राजकारण्यांना अंगावर घेण्याच्या सवयीमुळे कायम वेळेआधी बदलीची सवय असलेले तुकाराम मुंढे नाशिकच्या आयुक्तपदाचा कार्यकाल तरी पूर्ण करणार का हेच पाहायचं आहे.  कारण 'नाशिक मी दत्तक घेतलंय' ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणूक वेळी केलेली घोषणा आणि त्यावर नाशिककरांनी ठेवलेला विश्वास यामुळं आज भाजपची नाशिकला एकहाती सत्ता आहे. मात्र भाजपला पहिल्यांदाच जरी एकहाती सत्ता काबीज करण्यात यश आलं असलं तरी अंतर्गत कलहाचं ग्रहण सध्या भाजपला लागलंय. याचमुळे कर्तव्यकठोर म्हणून नाव कमावलेल्या तुकाराम मुंढेंना पालिका आयुक्त म्हणून काम करताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close