चाकणमध्ये व्हॉट्सअप स्टेट्सच्या वादातून 17 वर्षीय अनिकेतचा खून !

चाकणमध्ये व्हॉट्सअप स्टेट्सच्या वादातून 17 वर्षीय अनिकेतचा खून !

पुण्याजवळील चाकण मध्ये एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्या गेल्याची एक भयानक घटना उघडकीस आलीय, याहूनही धक्कादायक बाब म्हणजे केवळ whats app वर ठेवलेल्या स्टेट्स वरुन झालेल्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:

17 फेब्रुवारी, पिंपरी चिंचवड: पुण्याजवळील चाकण मध्ये एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्या गेल्याची एक भयानक घटना उघडकीस आलीय, याहूनही धक्कादायक बाब म्हणजे केवळ whats app वर ठेवलेल्या स्टेट्स वरुन झालेल्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चाकणमध्ये राहणाऱ्या सतरा वर्षीय अनिकेत शिंदेला खरंतर चांगला अभ्यास करून भविष्यात समाजामध्ये चांगलं स्टेटस मिळवण्याचं होतं. मात्र व्हॉट्स अॅपच्या स्टेटसपायी अनिकेतला ऐन उमद्या वयात जीव गमवावा लागलाय. हे ऐकून कुणाचीही मती गुंग होईल अशी ही धक्कादायक घटना पुण्याजवळच्या चाकणमध्ये घडलीय.

अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप बनवला. काही दिवसातच ग्रुपमधल्या सदस्यांचे मतभेद सुरु झाले. एकमेकांना हिनवण्यासाठी आपलं स्टेटस बदलण्याचा सिलसिला सुरु झाला. एकानं 'द किंग' असं स्वतःचं स्टेटस ठेवलं. तर त्याला शह देण्यासाठी दुसऱ्यानं 'आपणच बादशाह' असा स्टेटस ठेवलं. यातून स्टेटस वॉर सुरु झालं. त्याचं रुपांतर भांडणात झालं. पुढे वाद इतका विकोपाला गेला की अनिकेत आणि त्याच्या मित्रावर रिव्हॉल्वर... कोयत्यानं वार करून अनिकेतची हत्या करण्यात आली.

मारेकरी चाकणच्या याच संग्रामदुर्ग किल्ल्याच्या परिसरात अनिकेत आणि त्याच्या मित्राला घेऊन आले. इथेच अनिकेतची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या या निर्घृण हत्याकांडानं एकच खळबळ उडालीय. वर्च्युअल जगात वावरणारी लहान मुलं वर्च्युअल स्टेटससाठी एकमेकांच्या जीवावर उठत असतील तर हे सगळ्या पालकांसाठी आणि समाजासाठी अतिशय चिंताजनक आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2018 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...