चाकणमध्ये बैलगाडा मालकांचे रास्तारोको आंदोलन

चाकणमध्ये बैलगाडा मालकांचे रास्तारोको आंदोलन

चाकणमध्ये आज पुणे - नाशिक महामार्गावरती बैलगाडा मालकांनी 3 तास रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात सहभागी झालेले खासदार शिवाजी आढळराव, आमदार महेश लांडगे आणि बाला सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

  • Share this:

पुणे, 28 ऑक्टोबर : चाकणमध्ये आज पुणे - नाशिक महामार्गावरती बैलगाडा मालकांनी 3 तास रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात सहभागी झालेले खासदार शिवाजी आढळराव, आमदार महेश लांडगे आणि बाला सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चार वर्षांपासून बंदी आलेली बैलगाडा शर्यत आजतागायत वेगवेगळी कारणं देऊन बंद ठेवण्यात आलीय. मुलाप्रमाणे जीव लावलेले बैल सांभाळणे या शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांनी या आंदोलनाचा एल्गार उभा केलाय.

बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या पेटा संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आलीय. पेटा हटवा, बैल वाचवा, अशा आशयाचे फलकही घेऊन सरकारविरोधात निरर्शनं करण्यात आलीत. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धेला परवानगी मिळू शकते तर महाराष्ट्रात बळीराजाच्या संस्कृती अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीला परवानगी का मिळत नाही, असा सवाल आंदोलन कर्त्यांनी सरकारला केलाय. बैलगाडा मालकांनी रस्त्यावरच बैल बांधल्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 04:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading