नेमकी कशी होती शंभर वर्षांपूर्वीची एक रुपयांची नोट ?

नेमकी कशी होती शंभर वर्षांपूर्वीची एक रुपयांची नोट ?

एक रुपयाच्या नोटेला आज शंभर वर्षे पूर्ण होतायत. पण सर्वानाच उत्सुकता आहे ती म्हणजे शंभर वर्षे जुनी नोट कशी होती. न्यूज १८ लोकमत खास तुमच्यासाठी एक रुपयांच्या नोटेचा शंभरीचा प्रवास सांगणार आहे. जुन्या नोटांचे संग्राहक माल्कम तोडीवाला यांच्याकडच्या संग्रहात ही सर्वात जुनी एक रुपयांची नोट आढळून आलीय.

  • Share this:

30नोव्हेंबर, मुंबई : एक रुपयाच्या नोटेला आज शंभर वर्षे पूर्ण होतायत. पण सर्वानाच उत्सुकता आहे ती म्हणजे शंभर वर्षे जुनी नोट कशी होती. न्यूज १८ लोकमत खास तुमच्यासाठी एक रुपयांच्या नोटेचा शंभरीचा प्रवास सांगणार आहे. जुन्या नोटांचे संग्राहक माल्कम तोडीवाला यांच्याकडच्या संग्रहात ही सर्वात जुनी एक रुपयांची नोट आढळून आलीय. या एक रुपयांच्या बदलत्या नोटांचा इतिहासही मोठा रंजक आहे.

भारतात चलनातल्या नोटा 1861 पासून सुरू झाल्या. तर आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 1917 रोजी भारतात पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आली. आधी एक रुपयाचं चांदीचं नाणं चलनात होतं. पण पहिल्या महायुद्धात चांदी महागली. त्यामुळे लोक चांदीची नाणी वितळवून त्याच्या विटा करून विकू लागले. म्हणून ब्रिटीश सरकारनं चांदीच्या नाण्याऐवजी एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला. या नोटेची छपाई इंग्लंडमध्ये करण्यात आली होती.

1969 पर्यंत काही आखाती देशांमध्येही भारतीय एक रुपयाच्या नोटेचा वापर होत होता. या जुन्या नोटांचा भाव आता खूप आहे.1985 मधल्या एक रुपयाच्या नोटेला तब्बल 2 लाख 75 हजार इतकी किंमत मिळाली. म्हणजेच जुन्या एक रुपयाच्या नोटा तुमच्याजवळ असतील तर त्या विकून तुम्ही मालामाल होऊ शकता.

एक रुपयांच्या नोटेच्या 'शतकपूर्ती'चा रंजक इतिहास

- पहिल्या नोटेवर किंग जॉर्ज पाचवे यांचा फोटो होता.

- पहिल्या नोटेवर 3 इंग्रज अर्थ सचिव, एमएमएस गबे, ए. सी. मॅकवॉटर्स आणि एच. डेनिंग यांच्या सह्या होत्या

- 1926 साली ही नोट चलनातून बाद केली

- 1940 साली पुन्हा चलनात आणली गेली.

- तब्बल ५४ वर्षांनंतर 1994मध्ये पुन्हा चलनातून बाद केली, तर लोकाग्रहास्तव 2015 साली पुन्हा चलनात आली.

- कायदेशीररित्या, सरकारदरबारी ही नोट नाही बरं का, हे नाणं आहे.

- आणि ही नोट रिझर्व बँक नाही, भारत सरकार छापतं. त्यामुळेच यावर रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची नाही तर

वित्त सचिवांची सही असते.

First published: November 30, 2017, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading