S M L

मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील 'लाल दिवा' हटवणार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2017 02:53 PM IST

मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील 'लाल दिवा' हटवणार

19 एप्रिल :  मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालणाऱ्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

1 मेपासून हा निर्णय लागू होणार आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्ष यांनाच लाल दिव्याची गाडी वापरता येणार आहे.

दरम्यान, हा निर्णयामुळे केंद्रासह इतर राज्यातही हा नियम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close