Home /News /news /

BREAKING : केंद्राने राज्य सरकारला फटकारलं, प्रवासी आणि माल वाहतुकीबाबत पुन्हा दिली मोठी सूट

BREAKING : केंद्राने राज्य सरकारला फटकारलं, प्रवासी आणि माल वाहतुकीबाबत पुन्हा दिली मोठी सूट

राज्याअंतर्गत आणि राज्या-राज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारलं आहे.

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लॉकडाउनच्या तीन टप्प्यांनंतर अनलॉक घोषित करण्यात आला. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल केला जात असून, राज्याअंतर्गत आणि राज्या-राज्यातील प्रवासी व माल वाहतुकीवरील बंदीवरून केंद्रानं राज्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर ही बंदी उठवण्याचे निर्दश दिले आहेत. राज्यांतील आणि परराज्यातील वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसंच राज्याबाहेरही खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, याआधी राज्य सरकारने 19 ऑगस्ट रोजी राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि आंतरजिल्हा आण आंतरराज्य वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरातच अडकून बसले. यादरम्यान लोकांचे मोठे हाल झाले. मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या