शिर्डीत साईबाबांच्या शंभराव्या पुण्यतिथीचा उत्सव, तीन दिवस चालणार हे कार्यक्रम

शिर्डीत साईबाबांच्या शंभराव्या पुण्यतिथीचा उत्सव, तीन दिवस चालणार हे कार्यक्रम

आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 18 ऑक्टोबर : आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे.

साईबाबांच्या समाधीला आज शंभर वर्षे पुर्ण होताहेत. विजयादशमीच्या दिवशी 1918 साली साईबाबांनी आपल्या शरीराचा त्याग केला या घटनेला आज शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून हा पुण्यतीथी उत्सव शिर्डीत साजरा होतोय, हजारो भाविक आपल्या आराध्य साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. आज तर साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पुर्ण होत असल्याने हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी साईसंस्थानने जय्यत तयारी केली आहे.

तीन दिवस हा उत्सव चालणार असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर साईबाबांच्या फोटो आणी पादुकांची साईमंदिरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत साई संस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ आणी साईभक्त सहभागी झाले होते.

दिवसभर विविध कार्यक्रम शिर्डीत पार पडणार आहेत. साई शताब्दी उत्सवानिमित्त साई मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळला आहे. आज साईंच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे साई संस्थानसह भावीकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

जगभरातून साई भक्त मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल होत असून अवघा साई मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलाय. मंदिर परिसरात फळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सफरचंद, मोसंबी, कणीस, ऊस यासह विविध फळांचा गालिचाच तयार करण्यात आला असून ही सजावट साई भक्तांचे आकर्षण ठरली आहे.

तर मुंबईच्या द्वारकामाई भक्त मंडळाने बनवलेले आकर्षक ब्रह्मांडनायक हे प्रवेशद्वारही भक्तांचे स्वागत करत आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी साईमंदिर आज रात्रभर खुले राहणार असल्याने आज रात्रीदेखील आपल्याला साई समाधीचे दर्शन घेता येणार आहे.

गेल्या वर्ष भरापासून साई समाधी शताब्दी उत्सव साजरा करण्यात येत आहे यात वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन साई संस्थानने केले होते. गेल्या वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्सवाला सुरूवात झाली होती तर उद्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समाधी शताब्दी महोत्सवाचा समारोप होणार आहे. पंतप्रधान शिर्डीत येणार असल्याने त्याचीही संस्थान आणी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे तर शिर्डीला एक प्रकारे छावणीचे स्वरूप आले आहे.

 VIRAL VIDEO: 425 कोटींचे दागिने घालून या बायका खेळतायत गरबा!

First published: October 18, 2018, 7:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading