CBSE Board Results : बारावीच्या निकालात पुन्हा मुलींनी मारली बाजी

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाचे बारावी परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यात या वर्षीसुद्धा मुलींनी बाजी मारली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 02:19 PM IST

CBSE Board Results : बारावीच्या निकालात पुन्हा मुलींनी मारली बाजी

नवी दिल्ली, 2 मे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाचे बारावी परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले.  83. 4 % विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  या वेबसाईट्सवर हे निकाल बघता येतील. या वर्षी बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.

हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा यांनी CBSE बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या आल्या आहेत. त्यांना 499 गुण मिळाले आहेत.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88.7 टक्के आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 79.4 % आहे. एकूण निकाल 83. 4 टक्के लागला आहे. केंद्रीय बोर्डाच्या या परीक्षेत विभागीय निकालांचा अभ्यास करता सर्वात चांगला निकाल दक्षिणेच्या त्रिवेंद्रम बोर्डाचा लागला आहे. CBSE ज्या शहरात आहे त्या दिल्लीचा क्रमांक तिसरा आहे.

CBSE च्या अधिकृत बेवसाईटवर निकाल थेट पाहता येईल. त्यासाठी विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र क्रमांक माहिती असणं आवश्यक आहे. Roll Number, School No., Centre No. आणि Admit card no. टाकल्यानंतर रिझल्ट समोर दिसेल.

त्रिवेंद्रमचा निकाल सर्वाधिक

Loading...

त्रिवेंद्रम विभागात 98.2% तर दिल्ली विभागात 91.87 % इतका निकाल लागला आहे. बारावीचे निकाल अपेक्षेपेक्षा लवकर लागले आहेत. मेच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचेही निकाल घोषित होणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थीजीवनातल्या या महत्त्वपूर्ण परीक्षेचे निकाल लागणार आहेत. मे च्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या पेपर तपासणीचं कामही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, 12 मे ते 17 मे दरम्यान निकाल जाहीर करण्यात येतील. पण काही कारणानं याला विलंबही होऊ शकतो, अशा अर्थाच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  निकालासंदर्भात सूचना जारी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...