मुंबई, 03 मार्च : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर 4 मार्चला होणार आहे. विज्ञान हा तसा काहींना कठीण पण महत्त्वपूर्ण विषय समजला जातो. इंजिनियरिंग आणि मेडिकलला जाणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा विषय फार महत्त्वाचा आहे. विज्ञान विषयात चांगले मार्क मिळवण्यासाठी नीट नियोजन करून वेळेत संपूर्ण पेपर टापटीप पद्धतीनं आणि योग्य सोडवणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागते. कमी वेळ हातात असल्यानं काही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डोळ्याखालून घातल्या तर साधारण यंदाज येतो त्यासाठी आम्ही आपल्याला CBSE Class 10 Science चा एक सराव पेपर दिला आहे.
For more sample papers of CBSE Class 10, please Click here:
विज्ञान विषयात चांगले गुण कसे मिळवाल?
1. महत्त्वाच्या व्यख्या, त्यांची नावं, सूत्र, आकृत्या व्यवस्थित काढा. पेपर सोडवताना आकृत्या आणि सूत्रांचा आवश्यक तिथे वापर करा. सर्व प्रश्न सोडवण्यावर भर द्या.
2. केमिकल फॉर्म्युले व्यवस्थित मांडून सोडवा. काढलेल्या आकृतीला नावं द्या.
3. नवीन प्रश्न नवीन पानावर. उत्तर पत्रिका लिहिताना किमान वाचनीय अक्षरात आणि स्वच्छ दिसेल अशी लिहावी. खाडाखोड झाली असेल तर एक रेष मारून पुढे जावे. एकाच वेळी चार रेषा मारल्यामुळे उत्तर पत्रिका वाईट दिसते.
4. जे येत नाहीत असे प्रश्न पुन्हा वाचा, उत्तराची सुरुवात चांगली करायला हवी. कारण पेपर तपासणारे शिक्षण संपूर्ण उत्तर वाचतीलच असं नाही. त्यामुळे ते पहिल्या काही ओळी वाचून पुढे नजर फिरवतात. त्यामुळे उत्तराची सुरुवात चांगली करा.
5. पेपर सुटसुटीत आणि टापटीप ठेवा, खाडाखोड किंवा जोडून लिहिलं आणि वाचण्यास त्रास झाला तर पेपर तपासणारे शिक्षक वैतागतात. जेवढा पेपर टापटिप तेवढा लवकर तपासून पुढे सरकतात.
6. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षांचे काही पेपर नजरेखालून घाला त्यामुळे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याची आयडिया मिळते.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.