मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /CBSE 12th Result: बारावीचा निकाल आणखी लांबणार? निकालाबाबत बोर्डानं शाळांना दिले महत्त्वाचे निर्देश

CBSE 12th Result: बारावीचा निकाल आणखी लांबणार? निकालाबाबत बोर्डानं शाळांना दिले महत्त्वाचे निर्देश

बारावीचा निकाल अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै:  महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा (SSC board results) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र आता CBSE च्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. नेहमी लवकर जाहीर होणारा CBSE चा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) यंदा उशिरा जाहीर होत आहे. मात्र आता CBSE बारावीच्या निकालासंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे बारावीचा निकाल अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकालासंबंधी (CBSE 12th Result) उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी 22 जुलै हे तारीख दिली होती. मात्र आता ही तारीख वाढवून 25 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजतापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“CBSEशी संबंधित सर्व शाळा दहावी आणि बारावीचा निकाल (CBSE 10th and 12th result date) तयार करण्यात व्यस्त आहेत. इयत्ता 12 वीचा निकालासंबंधी सर्व कामं पूर्ण करण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. सर्व प्रादेशिक कार्यालययं, परीक्षा विभाग आणि बोर्ड मुख्यालय शेवटच्या तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी आणि शाळांना मदत करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करतील अशी माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हे वाचा - MH CET 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेबाबतच्या या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

“CBSE ला ईमेल व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शाळांकडून काही प्रश्न आणि विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात प्रश्न आणि उत्तरं तयार केली जात आहेत आणि अशी अपेक्षा आहे की या सर्व शाळांना दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल जेणेकरुन शाळा योग्य ती कारवाई करू शकतील असंही CBSE बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

याआधी CBSE बोर्डानं शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणांसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर अपडेट करण्यातही काही कालावधी दिला होता. मात्र काही शाळांना यंत्र अडचणी आल्यामुळे ही तारीख आता वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे बारावीचा CBSE चा निकाल काही काळ उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: CBSE, Exam result, HSC