माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे

  • Share this:

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज सकाळी छापा टाकला आहे. चिदंबरम यांच्यासह त्याचा मुलगा कार्थी चिदंबरम यांच्या घरावरही ही धाड टाकण्यात अाली आहेत. तसचं कार्थी यांच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. दिल्ली, चेन्नई, नोएडासह एकून 14 प्रॉपर्टीझवर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

एअरसेल-मॅक्सिससाठी लाच घेतल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आहे. याप्रकरणी सीबीआयने देशभरात एकून 14 ठिकाणी छापे मारले असल्याचे सांगण्यात येते.

 काय आहे प्रकरण?

2006 मध्ये झालेल्या एअरसेल-मॅक्सिस यांच्या 3,500 कोटी रुपयांच्या व्यवहारास परकीय गुंतवणूक वृद्धी मंडळाद्वारे (FIPB) मंजूरी दिल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने आज हा छापा मारला. एअरसेल-मॅक्सिसच्या व्यवहारात 600 कोटी रुपयांपर्यंतच मान्यता देण्यासंबंधी अर्थमंत्र्यांना अधिकार असताना चिदंबरम यांनी या मर्यादेचे उल्लंघन करून 3,500 कोटी रुपयांच्या व्यवहारास मान्यता दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हा आरोप केला होता. कायद्याच्या पलिकडे जाऊन चिदंबरम यांनी काम केल्याचंही स्वामी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं.

मनी लॉंडरिंग प्रकरणात सीबीआईने सोमवारी एफआईआर दाखल केली. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. INX मीडिया कंपनी ही पीटर मुखर्जीच्या मालकीची यांची आहे.

गेल्या महिन्यात कार्थी चिदंबरम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कार्थी चिदंबरमशी संबंधित असलेल्या या कंपनीवर फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एअरसेल-मॅक्सिस आर्थिक व्यवहार प्रकरणी सुद्धा त्याची चौकशी सुरू असून अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि कार्थी चिदंबरमला ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एअरसेल-मॅक्सिस करारात आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप झाल्यानंतर अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे. यूपीए सरकार असतानाही या प्रकरणात चौकशी झाली होती. आता परत याप्रकरणात चौकशी सुरू झाली आहे.

First published: May 16, 2017, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading