एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचे छापे

सीबीआयने काल पहाटेपर्यंत प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांच्या दिल्ली आणि देहरादून येथील घरावर छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2017 06:52 PM IST

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचे छापे

05 जून : एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले. सीबीआयने काल पहाटेपर्यंत प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांच्या दिल्ली आणि देहरादून येथील घरावर छापे टाकण्यात आल्याचं कळतंय.

प्रणव राॅय यांच्यावर बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. एनडीडीव्हीने आयसीसीआय बँकेकडून 48 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण यात फेरफार झाल्याचा आरोप बँकेनं केलाय. त्यानुसारच सीबीआयने प्रणव राॅय यांच्या घरावर छापे मारले. प्रणव राॅय आणि त्यांची पत्नी राधिका राॅय यांची सीबीआय चौकशी करत आहे.

भाजपचे प्रवक्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी टि्वट करून, कायदाचा धाक सगळ्यांवर राहिला पाहिजे. मग तो कोणीही असला तरी चालेल असं म्हटलंय.

मात्र, एनडीटीव्हीने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. सीबीआयने एनडीटीव्ही आणि त्यांचे प्रमोटर्स यांना खोट्या आरोपाखाली लक्ष्य केलंय. एनडीटीव्ही आणि त्यांचे प्रमोटर याविरोधात शेवटपर्यंत लढा देत राहणार आहे. भारतात लोकशाही असून सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचं खच्चीकरण होत असून आम्ही शांत बसणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 06:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...