'आयआरबी'चे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'लगतची शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी 'आयआरबी'या टोलकंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह 18 जणांविरोधात सीबीआयने आज पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची 73.88 हेक्टर जमीन जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.

Chandrakant Funde | Updated On: Dec 6, 2017 09:01 PM IST

'आयआरबी'चे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

06 डिसेंबर, पुणे : मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'लगतची शासकीय जमीन हडपल्याप्रकरणी 'आयआरबी'या टोलकंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह 18 जणांविरोधात सीबीआयने आज पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची 73.88 हेक्टर जमीन जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.

याप्रकरणी म्हैसकर यांच्याविरूद्ध 15 ऑक्टोबर 2009 रोजी रितसर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं. पण पुढे काहीच झालं नाही. आता अखेर सीबीआयने म्हैसकर यांच्यासह 18 आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केलंय. बनावट कागदपत्रे बनवणे, कटकरस्थान रचून शासनाची फसवणूक करणे अशा पद्धतीचे आरोप सीबीआयच्या दोषारोप पत्रात ठेवण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close