Home /News /news /

सीबीआय कोर्टाचा लालूंना जेलमध्येही गाई पाळण्याचा सल्ला !

सीबीआय कोर्टाचा लालूंना जेलमध्येही गाई पाळण्याचा सल्ला !

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावताना न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी चक्क जेलमध्येच गायी पाळण्याचाही मिश्किल सल्ला दिलाय. चारा घोटाळ्यातील सर्व आरोपींना खुल्या कारागृहात ठेवलं तर या सर्वांना नक्कीच गाई पाळता येतील. तसंही या सर्व आरोपींना गाई पाळण्याचा अनुभव आहेच म्हणा, अशी मिश्किल टिप्पणीही सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी केलीय.

पुढे वाचा ...
06 जानेवारी, रांची : चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावताना न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी चक्क जेलमध्येच गायी पाळण्याचाही मिश्किल सल्ला दिलाय. चारा घोटाळ्यातील सर्व आरोपींना खुल्या कारागृहात ठेवलं तर या सर्वांना नक्कीच गाई पाळता येतील. तसंही या सर्व आरोपींना गाई पाळण्याचा अनुभव आहेच म्हणा, अशी मिश्किल टिप्पणीही सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी केलीय. चारा घोटाळ्यातील सर्व आरोपींची प्रकृती ठणठणीत असल्याचा अहवाल पोलिसांनी कोर्टात सादर केल्यानंतर कोर्टानं या सर्वांना खुल्या जेलमध्ये ठेवलं तर बरच होईल. अशी इच्छी व्यक्त केली. अर्थात कारागृह प्रशासन कोर्टाची ही इच्छा खरंच अंमलात आणतंय का हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण तसंही लालू प्रसाद यांचं गाई प्रेम सर्व सर्वश्रूत आहे. गाईची धार काढतानाचे त्यांचे फोटो आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यामुळे लालू प्रसाद यांच्यासह इतर 6 आरोपींना खरंच खुल्या कारागृहात ठेवलं तर लालू खरंच जेलमध्येही गाई पाळतात का हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. दरम्यान, रांची सीबीआय कोर्टाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं लालूंचे आमदार पूत्र तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. त्यामुळे हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती देऊन लालूंना जामीन मंजूर केला तर मात्र, लालूंनी जेलमध्ये गाई पाळाव्यात, ही सीबीआय कोर्टाची ईच्छा कदाचित अपूर्णच राहिल. दरम्यान, रांचीच्या या सीबीआय कोर्टात लालूंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेश केलं असता लालूंनी अतिशय पाळल्याचं बघायला मिळालं. कोर्टानं शिक्षा सुनावताना त्यांचे नाव पुकारताच लालू प्रसाद यांना आदरपूर्वक नमस्कार केला.  
First published:

Tags: Lalu prasad yadav with caw, जेलमध्ये गाईपालन, रांची सीबीआय कोर्ट, लालू आणि गायीपालन, लालूंना शिक्षा, सीबीआय कोर्ट

पुढील बातम्या