औरंगाबाद, 19 आॅगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकरांची गोळी झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय. गोळी झाडणाऱ्याला औरंगाबादमधून अटक झालीये. त्यामुळे एटीएस आणि सीबीआयच्या हाताला तब्बल 5 वर्षांनी मोठं यश आलंय. सचिन अंदुरे असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्यानं हत्येची कबुली दिल्याची माहिती सीबीआयनं दिलीये. नऊ महिन्यांपासून तो औरंगाबादेत राहण्यासाठी आला होता.
सचिन आणि त्याची पत्नी दोघेही औरंगाबादेत कामानिमित्ताने आले होते. औरंगाबादेतील रोजा बाझार भागात राहात होता.बँक कर्मचारी असलेले घरमालक राधाकिशन बाबुराव शिंदे यांने त्याचा स्वभाव पाहुन त्याला भाड्याने घर दिले. नवरा बायको दोघेच घरात राहत होते. गेल्या 9 महिन्यांपासून तो इथं राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्याला मुलगी झाली. घरमालकाला कुठे काम करतो याबद्दल अजिबात माहिती नव्हती. फक्त नोकरीला जातो एवढंच जुजबी उत्तर देत होतो. 14 तारखेला पाच ते सहा लोकं त्याच्याकडे आले होते. ते सचिनला भेटण्यासाठी आले असल्याचं सांगितलं आणि काही तासांत ते निघून गेले त्यानंतर काही दिवसांनंतर वृत्तपत्रात बातमी वाचून धक्का बसला असंही घरमालक म्हणाले.
2013 मध्ये पुण्यात बालगंधर्व पुलावर मॉर्निंग वॉकवेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या..बाईकवर आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.. यानंतर हल्लेखोर पसार झाले. तपास यंत्रणांनी जंग जंग पछाडल्यानंतर अनेक संशयितांची नावं समोर आली होती. मात्र ठोस पुरावे हाती लागत नव्हते. दरम्यान, नालासोपारा स्फोटातील आरोपींकडून तपासात ही नावं पुढे आली आणि डॉ दाभोलकर हत्या प्रकारणाचं गुढ उकललंय.
सचिन अंदुरे कोण?
औरंगाबादमधून 14 ऑगस्टला अटक
सचिन अंदुरेचे आईवडील हयात नाहीत
भाड्याच्या घरात बायको आणि मुलासह राहत होता
निराला बाजार भागातल्या कपड्याच्या दुकानात काम करत होता
VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!