• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कोरोना काळात करदात्यांना मोठा दिलासा, ITR भरण्यासाठी मुदत वाढवली

कोरोना काळात करदात्यांना मोठा दिलासा, ITR भरण्यासाठी मुदत वाढवली

आर्थिक वर्ष 2018-19 ((AY 2019-20) )साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती.

 • Share this:
  नवी, दिल्ली, 30 जुलै: कोरोनामुळे अनेक उद्योग आणि काम बंद असल्यानं ITR कसा भरायचा हा प्रश्न अनेक करदात्यांसमोर उभा होता. सध्याची स्थिती विचारात घेऊन सीबीडीटीकडून आयकर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कर भरण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख देण्यात आली होती. ही मुदत सीबीडीटीकडून वाढवण्यात आली असून आता 30 सप्टेंबरपर्यंत आयकर भरता येणार आहे. कोरोना काळात या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return ITR) फाईल करण्याची केंद्र सरकारनं 31 जुलै ही अंतिम तारीख दिली होती. ही मुदत वाढवल्यानं आता आणखीन एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने एका अधिसूचनेच्या माध्यमातून 2019-20 आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटी अधिनियमाच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची डेडलाइन 30 सप्टेंबरपपर्यंत 2020 पर्यंत वाढवली आहे. हे वाचा-पुढच्या आठवड्यापासून राज्यात मॉल उघडणार, इतर निर्बंध मात्र 31 ऑगस्टपर्यंत वाढले आयकर विभागानं या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे हजारो करदात्यांना मोठा दिलासा आणि ITR भरण्यासाठी मुदत मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 ((AY 2019-20) )साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे आणि लॉकडाऊनमुळे कर भरण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांना ITR भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ CBDTकडून देण्यात आली आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: