Castrol Activ ने #ProtectIndiasEngine या कॅम्पेनच्या निमित्ताने एक नवा मापदंड निर्माण केलाय

Castrol Activ ने #ProtectIndiasEngine या कॅम्पेनच्या निमित्ताने एक नवा मापदंड निर्माण केलाय

आपल्या मेकॅनिक्सना पाठबळ देण्यासाठी Castrol Activ आणि Network18 ने एकत्र येऊन #ProtectIndiasEngine हे कॅम्पेन सुरू केले आहे.

  • Share this:

आपल्याला #NonStop पुढे जाण्यास मदत करणाऱ्या आपल्या परिसरातील मेकॅनिक्सना उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होण्यास मदत करण्याची हीच ती वेळ आहे.

संकटाच्या काळात योद्धे जन्माला येतात. आजवर भारतातील तरुणांनी संकटांवर मात करून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. कोरोनाव्हायरसची साथ आल्यावरदेखील युवक अशाच धीराने याचा सामना करत आले आहेत. आपल्या देशात कधीच मदतीची उणीव भासली नाही. अन्न, आश्रय व देखभाल या सर्वांची गरज असलेल्यांसाठी तरुण स्वयंसेवक एका हाकेवर धावून आले. देशाच्या कानाकोपऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी या निःस्वार्थ तरुणांची साथ दिली त्यांच्या दुचाकीने!

नुसतं धावून जाणं नाही तर युवकांमधील जबाबदारीची जाणीवच त्यांना समाजात बदल घडवण्यास उत्तेजित करते व हे सत्कर्म करण्यास दुचाकी त्यांना साथ देते. दुचाकी हीच भारतातील नवयुवकांची खरी ओळख आहे. क्षितिज गाठण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या या नव्या पिढीचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाचे साथीदार त्यांच्या परिसरातील विश्वासू मेकॅनिक्स आहेत. मेकॅनिक्सनी वर्षानुवर्षे वाहने चालू स्थितीत ठेवण्यास कायम आपल्याला साथ दिली आहे.

दुर्दैवाने आज या कष्टाळू मेकॅनिक्सना आपल्या आधाराची गरज आहे.

कोरोनाव्हायरस व न संपणाऱ्या लॉकडाऊनमुळे मेकॅनिक्स व त्यांच्या उद्योगांना मोठा फटका बसला आहे. अनेकांना काही काळापुरती त्यांचे काम थांबवावे लागले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे वाहनांचा वापर कमी झाल्याने व आरोग्यविषयक तक्रारींमुळे त्यांना नुकसान भरपाई करणेदेखील कठीण झाले आहे. या सगळ्यामुळे मेकॅनिक्सच्या रोजगारावर तर फटका बसलाच, शिवाय त्यांचे भविष्यही धोक्यात आले आहे. आपल्याला न थांबता पुढे जाण्यास मदत करण्याकरिता कायम हजर असलेल्या मेकॅनिक्सशिवाय भारतीयांचा दुचाकी चालवण्याचा अनुभव पूर्वीसारखा राहणार नाही.

Castrol Activ वर्षानुवर्षे मेकॅनिक्सची प्रगती व त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने झटत आहे. Castrol Super Mechanic हे त्यांचे प्रमुख उत्पादन भारतातील बाईक व गाड्या दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक्सचे कौशल्य पारखून त्यांना पाठबळ देते. गेल्या 3 वर्षांत Castrol ला भारतातील चक्क 2 लाखांपेक्षा जास्त मेकॅनिक्सच्या सहभागाचा अफाट प्रतिसाद मिळाला! त्यामुळेच मेकॅनिक्सनासुद्धा आपल्या मान्यतेच्या हक्काची व आपणदेखील वाहने बनवणाऱ्या कंपन्यांचा एक महत्त्वाचा दुवा आहोत याची जाणीव झाली.

पण सध्या काळ बदललाय. आपल्या मेकॅनिक्सना पाठबळ देण्यासाठी Castrol Activ आणि Network18 ने एकत्र येऊन #ProtectIndiasEngine हे कॅम्पेन सुरू केले आहे. या नावातूनच आपल्या लक्षात येते की मेकॅनिक्सना आधार देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी हे कॅम्पेन अनेकांसाठी एक योग्य माध्यम बनले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी बॉलिवूडमधील सुपरस्टार आयुष्मान खुराणा या कॅम्पेनच्या आघाडीवर आहे. अथक प्रयत्नांनी आपले नाव कमावणारा युवा पिढीचा प्रसिद्ध आयकॉन व अनेक वर्षं दुचाकी चालवणाऱ्या आयुषमान खुराणाने त्याला मेकॅनिक्सनी अडीअडचणीत कशी मदत केली हे सांगितले आहे.

याशिवाय दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेते शाईन शेट्टी व गणेश वेंकटराम आणि सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते रवी दुबे यांनीसुद्धा या कॅम्पेनला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे.

त्यांचे संदेश सरळ व सोपे आहेत. चला तर #ProtectIndiasEngine हे मंत्र ध्यानात ठेवून, वर्षानुवर्षे आपली वाहने सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने आपल्या मदतीस धावून येणाऱ्या आपल्या मेकॅनिक्सना आधार देण्याकरिता प्रतिज्ञा घेऊया. यासाठी आपल्याला फक्त दोन मिनिटे द्यावी लागतील, पण आपल्या या छोट्याशा प्रयत्नानेदेखील मोठा परिणाम होईल हे नक्की.

मेकॅनिक्स कल्याणकारी योजनेसाठी जास्तीत जास्त रु.50 लाखांपर्यंतचे योगदान करण्याचे लक्ष्य असलेले Castrol Activ प्रत्येक प्रतिज्ञेला 10 रुपयांची मदत करणार आहे. मेकॅनिक्सच्या प्रशिक्षणासाठी, त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी व उद्योग करण्याच्या सुरक्षित पद्धती सांगण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल.

त्यांच्या या पुढाकाराला पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी ग्राहक www.protectindiasengine.com/hindi या लिंकवर क्लिक करून प्लेज (प्रतिज्ञा) बटन दाबू शकतात किंवा 7574-003-002 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. आपला मदतीचा हात पुढे करण्याची हीच ती वेळ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने वी कॅन #ProtectIndiasEngine.

भागीदाराचे भाष्य

First published: September 15, 2020, 6:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या