S M L

काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं?

आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिजोरीत पैसाच नाहीये. त्यामुळे तिजोरीतला हा खडखडाट नेमका भरून काढायचा, हा प्रश्न काँग्रेसच्या धुरीनांना सतावतोय

Ajay Kautikwar | Updated On: May 24, 2018 05:19 PM IST

काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट, 2019 साठी पैशाचं सोंग आणणार कसं?

सागर वैद्य, प्रतिनिधी नवी दिल्ली,ता.24 मे: कर्नाटकच्या सत्तासंघर्षात भाजपला हरवल्यानंतर २०१९ च्या लोकसभेसाठी लढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सर्व मोदी विरोधकांची एकत्रत मोट बांधलीय खरी. पण आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या तिजोरीत पैसाच नाहीये. त्यामुळे तिजोरीतला हा खडखडाट नेमका भरून काढायचा, हा प्रश्न काँग्रेसच्या धुरीनांना सतावतोय

निवडणुका म्हटलं की प्रचार आलाच आणि प्रचार म्हटलं की पैसा हा ओघानं आलाच. कारण आजकालच्या कार्यकर्त्याचं भेळ भत्त्यावर भागत नाहीत. शौकिनांना तर चिंकन तंदुरीच लागते. मतदारराजालाही खुश ठेवावं लागतं, हल्लीतर गृहनिर्माण सोयायट्यांची निवडणूक काळातली डिमांडही वाढतच चाललीय, काही सोसायट्या रंगकामाची तर काही पेव्हर बॉल्कची डिमांड करतात,

एवढं सगळं करायचं म्हटलं तर पैसा हा लागतोच. आणि पैशांचं सोंग आणता येत नाही, म्हणूनच काँग्रेसची चिंता वाढलीय. आगामी लोकसभा लढण्यासाठी पक्षाकडे पैसाच नाहीये. केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून सर्व उद्योजकांनी निधीच्या बाबतीत काँग्रेसकडे पाठ फिरवलीय. अगदी स्पष्ट शब्दातच बोलायचं झालं तर काँग्रेसच्या तिजोरीत शब्दशः खडखडाट आहे. विश्वास बसत नसेल ही आकडेवारी बघा.

उद्योगपतींनी पक्षाकडे पाठ फिरवल्याने काँग्रेसने आता ऑनलाईन वर्गणी गोळा करण्याचा पर्याय स्वीकारलाय. तसंच सर्व प्रादेशिक शाखांना खर्च कमी करण्याचे आदेश दिलेत.  मोदींनी हरवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कालच्या कर्नाटक विजयातून नैतिक बळ भलंही मिळवलं असेल पण निवडणूक लढवायला पैसाच लागतो.

त्यामुळे सत्तर वर्षे देशावर राज्य करणारा पक्ष या आर्थिक विवंचनेतून नेमका कसा मार्ग काढतोय हे महत्वाचं ठरणार आहे.

Loading...
Loading...

काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट

वर्ष 2017 मधलं उत्पन्न

काँग्रेस - 225 कोटी

भाजप -  1034 कोटी

वर्ष 2016 मधलं उत्पन्न

काँग्रेस - 261 कोटी

भाजप - 570 कोटी

भाजपच्या वार्षिक निधीत 80 %वाढ

याउलट काँग्रेसच्या निधीत 14% घट

दोन्ही पक्षांचं उत्पन्न आणि खर्च

काँग्रेस - 225.36 घोषित उत्पन्न 321.66खर्च (कोटींमध्ये)

भाजप - 1034.2 घोषित उत्पन्न 710.05खर्च (कोटींमध्ये)

मिळालेल्या देणग्या

काँग्रेस - 365 कोटी

भाजप -  3690 कोटी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2018 05:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close