मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कृषी मंत्र्यांचा इन्शुरन्स कंपनीला दणका; शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ भोवली, गुन्हा दाखल

कृषी मंत्र्यांचा इन्शुरन्स कंपनीला दणका; शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ भोवली, गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला कृषी मंत्र्यांचा दणका, कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला कृषी मंत्र्यांचा दणका, कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीला कृषी मंत्र्यांचा दणका, कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती, 29 जुलै: राज्य शासनाने (Maharashtra Government) केलेल्या करारानुसार इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स (IFCO Tokio General Insurance) कंपनीचे कार्यालय येथे कार्यान्वित नसल्याचे कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात निदर्शनास आले. त्यामुळे या कराराचा भंग झाला असून, कंपनी विरुद्ध जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात (Gadge Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नाही आणि कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार कृषीमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांना अमरावती दौऱ्यात प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी या कंपनीच्या कार्यालयाची प्रत्यक्ष तपासणी केली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Rain Forecast: पाहा पुढील तीन दिवस कुठे बरसणार

कंपनीचे कार्यालय सुस्थितीत कार्यान्वित न झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे या कंपनीने खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, याबाबत तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विदर्भातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनी पीक विमा संदर्भात कार्यवाही करत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयातही जात पाहणी केली असता त्यांना आवश्यक यंत्रणा आढळून आली नाही.

First published:
top videos

    Tags: Farmer protest, Maharashtra, Mumbai