अडचणीत सापडला अर्जुन रामपाल, १ कोटी रुपये परत न केल्याच्याविरोधात गुन्हा दाखल

अडचणीत सापडला अर्जुन रामपाल, १ कोटी रुपये परत न केल्याच्याविरोधात गुन्हा दाखल

अर्जुनने गेल्या वर्षी मे महिन्यात वाईटी एण्टरटेनमेन्ट नावाच्या कंपनीकडून व्याजावर १ कोटी रुपये घेतले होते. हे कर्ज घेताना पुढील ९० दिवसांत तो १२ टक्के व्याजाने कर्ज फेडण्याचे अर्जुनने मान्य केलं होतं.

  • Share this:

बॉलिवूडचा देखणा हिरो अशी ओळख असलेल्या अर्जुन रामपाल मोठ्या वादात अडकला आहे. अर्जुनवर १ कोटी रुपये परत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका एण्टरटेनमेन्ट कंपनीच्या मते अर्जुनने त्यांच्याकडून १ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण त्याने ते परत केलं नाही. अर्जुनने गेल्या वर्षी मे महिन्यात वाईटी एण्टरटेनमेन्ट नावाच्या कंपनीकडून व्याजावर १ कोटी रुपये घेतले होते.

हे कर्ज घेताना पुढील ९० दिवसांत तो १२ टक्के व्याजाने कर्ज फेडण्याचे अर्जुनने मान्य केलं होतं. मात्र आत कंपनीच्या मते अर्जुनने असं काही केलं नाही. यावर कंपनीने अर्जुनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अर्जुन रामपालने स्पष्टीकरणही दिलं आहे. अर्जुनच्या मते, कंपनीकडून घेतलेल्या सर्व कर्जाची परत फेड त्याने केली आहे. असं असूनही कंपनीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता न्यायालयात सुनावणीच्यावेळी मी हे सिद्ध करून दाखवू शकेन. तर वाईटी एण्टरटेनमेन्ट अजूनही अर्जुनवर आरोप करत आहे की अर्जुनने पुढच्या तारखेचा एक चेक दिला होता. जेव्हा २३ ऑगस्ट २०१८ मध्ये चेकद्वारे बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की खात्यात तेवढे पैसेच नाहीत, त्यामुळे चेक बाऊंस झाला.

मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की ८ ऑक्टोबर २०१८ मध्ये अर्जुनला निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसनुसार, १४ दिवसांच्या आत अर्जुनला १२ टक्के व्याजासह कर्ज घेतलेली रक्कम फेडायची होती. मात्र अर्जुनने असं काही केलं नाही.

कंपनीने २९ ऑक्टोबरला अंधेरीतील न्यायालयात अर्जुन रामपालविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर अर्जुनने २२ नोव्हेंबरला ७.५ लाख रुपये दिले होते, मात्र पूर्ण कर्ज फेडलं नव्हतं. गेल्या मंगळवारी अर्जुन रामपाल विरोधात मुंबई हायकोर्टात १ कोटी ५० हजार रुपयांसाठी कॉमर्शियल खटला दाखल केला आहे.

VIDEO : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राज ठाकरे म्हणतात..

First published: February 15, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading