पैसे घेतले आणि अमिषा पटेल नाचलीच नाही, फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल दिलेलं वचन पूर्ण करू न शकल्यामुळे अडचणीत सापडली आहे.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल दिलेलं वचन पूर्ण करू न शकल्यामुळे अडचणीत सापडली आहे. एका इव्हेंट कंपनीने तिच्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप केला आहे. हे प्रकरण आताचं नसून २०१६ मधलं आहे.

मुरादाबादच्या ड्रीमव्हिजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मालक पवन शर्माचा आरोप आहे की, त्याच्या एका ग्राहकाच्या लग्नात डान्स करण्यासाठी अमिषाने ११ लाख रुपये घेतले होते. ही रक्कम आरोपी राजकुमारने न्यूमॅक्स एण्टरटेनमेंट कंपनीच्या नावावरून घेतली होती.

आता पवन यांच्या आरोपानुसार जेव्हा दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा आयत्यावेळी नकार दिला आहे. अमिषा पटेल आणि तिच्या टीमने कार्यक्रमात सहभाग घेण्यास स्पष्ट नकार दिला तसेच अतिरिक्त २ लाख रुपयांची मागणीही केली.

ड्रीमव्हिजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मालक पवन म्हणाले की, अमिषा आणि तिची टीम कोणतंही कारण न देता मुंबईत परतले. त्यांच्या या कृतीचा मला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.

पवन म्हणाले की, पैसे परत मागितल्यामुळे पवन यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर पवन यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले. अमीषा, अहमद शरीफ, सुरेश परमान आणि राजकुमार गोस्वामी यांच्यावर १२० ब, ४०६, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने सर्वांना १२ मार्चला हजर राहण्यास सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या