एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया आणि प्रती मेनन यांना मोठा दणका

एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया आणि प्रती मेनन यांना मोठा दणका

दाखल करण्यात आलेला बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज केला होता.

  • Share this:

जळगाव, 06 फेब्रुवारी : महसुलमंत्री एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयाकडून अंजली दमानिया आणि प्रिती शर्मा  यांना पुन्हा दणका देण्यात आला आहे.

महसूल-कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप केल्याने त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया आणि प्रिती मेनन यांच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात IPC 499, 500 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला आहे.

दाखल करण्यात आलेला बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर अर्जावर 29 सप्टेंबर 2018 दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद करण्यात आला होता आणि 12 ऑक्टोबर 2018 रोजी मुक्ताईनगर न्यायालयातर्फे अंजली दमानिया यांचा खटला रद्द करण्याचा अर्ज  फेटाळण्यात आला होता.

त्यानंतर मागील तारखेला मुक्ताईनगर न्यायालयातील कामकाजादरम्यान कायम गैरहजर राहू शकण्या करीता, अंजली दमानियांतर्फे  45 आणि प्रिती शर्मांतर्फे  19 अर्ज दाखल करण्यात आले होते. या निशाणी अर्जांबाबत काल सोमवारी मुक्ताईनगर न्यायालयात दोन्ही पक्षांतर्फे युक्तीवाद करण्यात आला.

दोन्ही पक्षांची बाजु एकल्यानंतर न्यायमूर्ती श्री.आर.एस.मानकर  यांनी अंजली दमानिया यांचा निशाणी 45 अर्ज आणि प्रिती शर्मा यांचा निशाणी 19 अर्ज हे दोघेही ( न्यायालयात कायम गैरहजर राहण्याकरीता परवानगीचे ) अर्ज रद्द केले.

त्याचप्रमाणे पुढील कामकाजाकरीता दिनांक 26 फेब्रुवारी 2019 ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढच्या तारखेला काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान

 

First published: February 6, 2019, 9:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading