पणजी, 15 जुलै: गोव्याचे भाजप उपाध्यक्ष अनिल होबले यांच्याविरोधात सुनेला डुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यात होबळे यांची पत्नी आणि मुलगा याला देखील आरोपी करण्यात आलंय. त्यांची सून सुचित्रा शिरोधर हिने यासंबंधी फिर्याद दाखल केलीय. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून आपल्याला मारहाण झाल्याचंही सुचित्रा यांनी तक्रारीत म्हटलंय.
कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, होबळे कुटुंबियांवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. होबळे यांची सून सध्या मुंबईत राहते. आपण सासरी गेलो असताना होबळे कुटुंबियांनी आपल्याकडे माहेराहून हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी आपला शारिरिक छळही केल्याचा आरोप सुचित्रा शिरोधर यांनी केलाय. दरम्यान, आरोपींविरोधात पुरेसे पुरावे आढळून न आल्याने याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा