News18 Lokmat

फारुख अब्दुलांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांनी कार चालकाला केलं ठार

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या परिसरात भरधाव वेगात एक कार घुसली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2018 11:42 AM IST

फारुख अब्दुलांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांनी कार चालकाला केलं ठार

जम्मू काश्मीर, 04 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या घराच्या परिसरात भरधाव वेगात एक कार घुसली आहे. फारुख अब्दुला हे ज्या परिसरात राहतात तो व्हीव्हीआयपी परिसर आहे. तिथे कोणासही जाण्यास परवाणगी नाही. पण अशा परिसरातही बॅरिगेट तोडून कार घेऊन एका व्यक्तीने भरधाव वेगात कार थेट त्यांच्या घरात धुसवली.

कार घरात घुसल्याने फारुख अब्दुला यांच्या घरातील सुरक्षा रक्षक अलर्ट झाले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात कार चालक ठार झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कोणा अज्ञाताने फारुख अब्दुला यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या नजरेकैदेत असलेल्या परिसरात त्याने थेट त्याची कार फारुख अब्दुला यांच्या घरात घुसवली. यावर घरातील सुरक्षा रक्षकांनी गाडीवर गळीबार केला आणि यात कार चालक ठार झाला आहे. हा कार चालक पूंछचा राहणारा असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ही गाडी कोणाची होती आणि कार चालक कोण होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. काश्मीर पोलीस आता याचा तपास घेत आहेत. त्यामुळे फारुख अब्दुला यांच्या घरात कोणी घुसण्याचा प्रयत्न केला याने संध्या मोठा गोंधळ उडवला आहे.

सध्या फारुख अब्दुला यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आला आहे. या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात आणखी एक व्यक्ती जखमी असल्याची माहितीही हाती लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2018 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...