भीषण अपघात! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

भीषण अपघात! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

कारचा वेग जास्त असल्यामुळे कार थेट पुलावरून खाली रत्यावर कोसळली. यामध्ये कारमधील 3 जण जखमी झाले असून यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

रायगड, 14 फेब्रुवारी : संपूर्ण देशात आज प्रेमाचा Valentine Day साजरा होत असताना राजगडमध्ये कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका कारला अपघात झाला आहे. पेणजवळ उड्डाणपुलावरून कार खाली कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपरघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पेणजवळ मध्यरात्री 1:30च्या सुमारास हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्यामुळे कार थेट पुलावरून खाली रत्यावर कोसळली. यामध्ये कारमधील 3 जण जखमी झाले असून यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जखमींवर एम.जी.एम. रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हॉटेल झी ग्रार्डनसमोर ब्रिजवरून कार (MH05EA 5576) 15 फूट उंचीवरून खाली पडली. कल्याणवरून श्रीवर्धनकडे जाताना हा अपघात झाला. अपघात घडताच स्थानिकांनी आणि घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढलं आणि नजिकच्या पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर गंभीर जखमींना एम.जी.एम पनवेल येथे उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.

इतर बातम्या - PM नरेंद्र मोदींना Valentine Day चं आमंत्रण, कार्डवर लिहिलं 'तुम कब आओगे...'

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघाताची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याच्या मध्ये असणारी अपघाती कार बाजूला करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांनी नावे

संध्या नथू पाटील

प्रीती दत्तू कडवे

राजेश शशिकांत मोरे

इतर बातम्या - पुलवामा हल्ला : शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: accident
First Published: Feb 14, 2020 08:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading