भाजपच्या प्रचार गाडीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही!

भाजपच्या प्रचार गाडीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही!

प्रचार गाडीला लागलेली आग विझवण्यात भाजप कार्यकर्त्यांना यश आलं असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

  • Share this:

उल्हासनगर, 12 ऑक्टोबर : उल्हानगरमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये गाडीला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपच्या प्रचार गाडीला ही आग लागली आहे. उल्हासनगरमधून कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेवेळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, माल्हर गावात प्रचाराच्या गाडीला आग लागल्यानंतर सगळ्यांचा गोंधळ उडाला. तर गाडीतील कार्यकर्त्यांनी वेळीच गाडीतून उड्या मारल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

प्रचार गाडीला लागलेली आग विझवण्यात भाजप कार्यकर्त्यांना यश आलं असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यादरम्यानच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठांवरून सांगितलं आहे. 2014 साली सत्ता येण्याआधी याबाबतचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्रातील जनमत लक्षात घेता भाजपने हा मुद्दा मागे सोडलेला दिसत आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'आमच्या सत्तेला साडेचार वर्ष झाल्यानंतर आम्ही वेगळा विदर्भ करू. कारण राज्यासह केंद्रातही आमची सत्ता आहे. असं आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला खासगीत बोलताना सांगितलं होतं,' असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र हतबल होतांना मी पाहू शकत नाही- राज ठाकरे

'देवेंद्र फडणवीस यांना वेगळा विदर्भ करायचा होता, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा जसजसा एक-एक महिना पुढे जात राहिला तसं त्यांना वाटत गेलं की आपण आता अख्ख्या महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री राहू शकतो. त्यामुळे त्यांचा तो विचार मागे पडला,' असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 12, 2019, 2:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading