नवी मुंबई: गाडीची टेस्ट घेताना दिला एक्सलेटरवर पाय, पहिल्या मजल्यावरून उडाली कार!

नवी मुंबई: गाडीची टेस्ट घेताना दिला एक्सलेटरवर पाय, पहिल्या मजल्यावरून उडाली कार!

पनवेलमधल्या खांदा कॉलनीतील किआ कंपनीच्या शोरुममध्ये पहिल्या मजल्यावरून एक कार शोरुमच्या काचा फोडून रस्त्यावर कोसळली.

  • Share this:

पनवेल, 10 डिसेंबर : अपघातामध्ये कार किंवा बस दरीत कोसळल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण चक्क शोरूममधून कार खाली कोसळ्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईच्या पनवेलमध्ये घडला आहे. पनवेलमधल्या खांदा कॉलनीतील किआ कंपनीच्या शोरुममध्ये पहिल्या मजल्यावरून एक कार शोरुमच्या काचा फोडून रस्त्यावर कोसळली.

ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. सायन पनवेल महामार्गालगत किआ या कंपनीचे कारचे शोरुम आहे. शोरुमच्या तळमजल्यावर किआ कंपनीचे कार्यालय असून पहिल्या मजल्यावर या कंपनीच्या गाड्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हायवेच्या दिशेने ये-जा करणाऱ्या लोकांना आलिशान कार दिसाव्यात यासाठी हायवेच्या दिशेने भिंत न उभारता या शोरुमला चकचकीत काचा लावण्यात आल्या होत्या.

पुणे: लिफ्ट दिल्यानंतर तरुणीशी केले अश्लील चाळे, रागात इमारतीवरून फेकलं खाली!

दररोजप्रमाणे या शोरुममधला कार ड्रायव्हर सगळ्या कारची तपासणी करण्यासाठी पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या एका कारमध्ये बसला. अचानक त्याचा पाय एक्सलेटरवर गेला आणि कारचा वेग वाढून ही कार एका क्षणात शोरुमच्या काचा फोडून पहिल्या मजल्यावरून थेट खाली रस्त्यावर कोसळली. या घटनेत ड्रायव्हर सुखरूप आहे.

इतर बातम्या - 'या' तीन कारणामुळे रखडलं होतं ठाकरे सरकारचं खातेवाटप, वाचा INSIDE STORY

ही कार पहिल्या मजल्यावरून रस्त्यांवर उभ्या असलेल्या इतर कारवर आदळल्याने यात इतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर शोरूमजवळ बघ्यांची गर्दी वाढली. कारला सध्या बाजूला काढण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या- लग्नानंतर दोघेही आत्महत्येसाठी गेले पण पत्नीने डोळ्यांदेखत पाहिला पतीचाच मृत्यू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या