कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक, 3 प्रवासी जागीच ठार तर 4 गंभीर जखमी

कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक, 3 प्रवासी जागीच ठार तर 4 गंभीर जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातमध्ये मृत्यू झालेले तीनही प्रवासी नगर येथील रहिवासी आहेत.

  • Share this:

अहमदनगर, 28 डिसेंबर : नगर सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी शिवारामध्ये एसटी बस आणि चारचाकी गाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर या अपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातमध्ये मृत्यू झालेले तीनही प्रवासी नगर येथील रहिवासी आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अरुण बाबुराव फुलसुंदर (वय 60) राहणार बुरुडगाव, अर्जुन योगेश भगत (वय 14) राहणार सिव्हिल हडको, तारा शंकर भगत राहणार नगर यांचा समावेश आहे तर अपघातात रत्ना अर्जुन फुलसुंदर यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.

अक्कलकोट येथून मालेगावकडे जाणारी बस क्रमांक एम एच 16 बीटी 3337 ही अंबिलवाडी शिवारामध्ये आली असता समोरून येणाऱ्या झायलो कार क्रमांक एम एच 16 एकटी 44 77 गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये झायलो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहे तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गाडीतील जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून 3 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

इतर बातम्या - पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? राधाकृष्ण विखेंचा मोठा खुलासा

बहिणीसोबत फिरत होता म्हणून फुटबॉलपटूची हत्या, NCPच्या नगरसेवक पुत्राविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उत्तम फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक असलेल्या प्रदीप विजय अलाट या युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून प्रदीपची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा पुत्र चेतन गायकवाड यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून प्रदीपला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे प्रदीपचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. मृत प्रदीप हा एक उत्कृष्ट फुटबॉलपटू होता. सोबतच विविध शाळांमध्ये क्रीडा प्रक्षिशक म्हणून ही कार्य करत होता. गावातल्या अशा तरुण मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - मंत्री होण्याआधीच अजित पवारांकडून बैठकींचा धडाका

सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळच्या सुमारास सोलापुरातल्या मोदी परिसरातील गंगामाई रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी त्याला दाखल करत पळ काढला. उपचारापुर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, आरोपी चेतन गायकवाडसह त्याचे मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 28, 2019, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading