News18 Lokmat

एक्सप्रेसवर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

कार आणि ऑटो वेगात असल्यामुळे जोरदार टक्कर झाली आणि त्यामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर तब्बल 12 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 04:02 PM IST

एक्सप्रेसवर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

यवतमाळ, 12 एप्रिल : यवतमाळमधील हैद्राबाद - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. यवतमाळच्या वडकी गावाजवळ कार आणि ऑटोची धडक झाली.

कार आणि ऑटो वेगात असल्यामुळे जोरदार टक्कर झाली आणि त्यामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर तब्बल 12 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहीती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळावरून जखमींना उपचारासाठी राळेगाव आणि वडणेर इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे तर अधिक मदतीसाठी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी होती. पण पोलिसांनी घटनास्थळावरून अपघाती वाहनं आणि मृतदेह बाजूला केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी 5 मृतदेह ताब्यात  घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहेत.

दरम्यान, या अपघातात कोणाची चूक होती याची अधिक माहीती मिळवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहेत.

तर या अपघातातील मृतांची ओळख आणि नावं पोलिसांकडून अद्याप सांगण्यात आलेली नाहीत. त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

Loading...


VIDEO: मनेका गांधी यांचं आक्षेपार्ह वक्तव्य; मुस्लिमांना उद्देशून म्हणाल्या, मतं द्या नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...