मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /आजारी मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना कारची धडक, पोलीस कर्मचारी महिलेचा मुलासह दुर्दैवी मृत्यू

आजारी मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना कारची धडक, पोलीस कर्मचारी महिलेचा मुलासह दुर्दैवी मृत्यू

 कोमल शिंदे यांचा 9 वर्षांचा मुलगा आजारी होता. आजारी मुलाला घेऊन कोमल शिंदे या रुग्णालयात जात होत्या.

कोमल शिंदे यांचा 9 वर्षांचा मुलगा आजारी होता. आजारी मुलाला घेऊन कोमल शिंदे या रुग्णालयात जात होत्या.

कोमल शिंदे यांचा 9 वर्षांचा मुलगा आजारी होता. आजारी मुलाला घेऊन कोमल शिंदे या रुग्णालयात जात होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 30 ऑगस्ट :   बीड (beed) जिल्ह्यात सिरसाळा-परळी रोडवर मन हेलावून टाकणार भीषण अपघात घडला आहे. दोन भरधाव कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहे. आजारी असलेल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास 9 वर्षाच्या मुलाचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडमधील सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात झाला. दिंद्रूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे यांचा 9 वर्षांचा मुलगा आजारी होता. आजारी मुलाला घेऊन कोमल शिंदे या रुग्णालयात जात होत्या. त्यांच्यासोबत गाडी चालक हा देखील पोलीस कर्मचारीच आहे. त्यांचे नाव नवनाथ लटपटे आहे. गाडी दिंद्रूडचे सह पोलीस निरीक्षक पुंडकर यांच्या एस क्रॉस गाडीतून तिघेजण जात होते.  बीड -परळी रोडवर अचानक समोरून एक भरधाव कार आली. त्यामुळे दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकांवर पडल्या होत्या. या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. या अपघातात कोमल शिंदे आणि त्यांचा मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

(रस्त्याच्याकडेला मस्ती करणं तरुणाला पडलं महागात, धावताना समोरुन आली कार आणि...Video व्हायरल)

या अपघातात जखमी नवनाथ लटपटे तसेच परळीचे शासकीय डॉक्टर डॉ.इलियास यांना सिरसाळा पोलिसांनी आणि नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दोघांव अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोमल शिंदे आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैजापूर येथील 3 तरुण अपघातात  ठार  

दरम्यान,  चोपडा इथं मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी गावाजवळ रात्री वैजापुरच्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात ३ तरुण ठार तर 6 जण जखमी झाले आहे. मयत आणि जखमी तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.  मध्य प्रदेशाच्या हद्दीत जामटी ता. वरला जि. बडवाणी येथे  रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झालाय. वैजापूर येथील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यात अपघात झाला. घटनास्थळावर दोन तरुण जागीच ठार झाले. तर दोन गंभीर जखमी तरुणांना जळगाव जिल्हा रुगणालयात हलविण्यात आले होते. त्यातील एकाचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.  दरम्यान, चोपडा शहर पोलिसात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली असून शून्य क्रमांकाने गुन्हा मध्य प्रदेशात वर्ग केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news