भरधाव वेगात पुलावरून कार कोसळली, 5 जण जागीच ठार

भरधाव वेगात पुलावरून कार कोसळली, 5 जण जागीच ठार

लातूर-बार्शी रस्त्यावर मुरुड अकोला(ता. लातूर)गावाजवळ पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 17 डिसेंबर :  लातूर-बार्शी रस्त्यावर मुरुड अकोला(ता. लातूर)गावाजवळ पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जागीच 5 जण ठार झाले आहेत. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत सर्वजण डिकसळ (ता. कळंब) इथले रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. डिकसळमधूव 7 जण कारने लातुरकडे विवाहासाठी येत होते. मुरुड अकोला गावाच्या पश्चिमेला ज्योतिबा मंदिराच्याजवळ असलेल्या पुलावरून कार 15 फूट खोल खड्ड्यात कोसळली आणि अपघात झाला.

या अपघातात कारमधील 5 जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर खंदारे, परमेश्वर अंबिरकर, गणेश सोमसे, जगन्नाथ पवार आणि नाना शिंदे अशी मृतांची नावं आहेत तर श्रीकांत अंबिरकर आणि दत्तात्रय जाधव अशी जखमींची नावं आहेत.

दरम्यान, अपगाताची माहिती मिळताच लातूर पोलीस आणि बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. तर या संदर्भात पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तर नेमका अपघात कसा झाला याचा पोलीस आता तपास करत आहे.

VIRAL VIDEO: सोनाराच्या डोळ्यादेखत पळवल्या सोन्याच्या बांगड्या

First published: December 17, 2018, 7:12 PM IST

ताज्या बातम्या