कॅप्टन कोहलीच्या फिटनेसमागे आहे ‘दीपिका’! वाचा काय आहे प्रकरण

कॅप्टन कोहलीच्या फिटनेसमागे आहे ‘दीपिका’! वाचा काय आहे प्रकरण

पहिल्यांदाच समोर आलं विराट कोहलीच्या फिटनेसमागचे गुपित. काय आहे दीपिका कनेक्शन?

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो. तंदुरुस्तीच्या बाबतीत अन्य भारतीय खेळाडूदेखील विराटला आपला आदर्श मानतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. फार कमीवेळा विराट फिटनेसमुळं संघाबाहेर गेला आहे. मात्र पहिल्यांदा विराट कोहलीच्या फिटनेसमागचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. मुळात विराट कोणत्याही क्रिकेटपटूमुळे नाही तर दीपिकामुळे फिटनेसकडे आकर्षित झालाय असे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शंकर बसू यांनी याबाबत खुलासा केला आहे.

टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक शंकर बसू यांनी विराटच्या फिटनेसचे गुपित सांगितले. विराट कोहलीला तंदुरुस्त राहण्याची खरी प्रेरणा मिळाली ती दीपिकाकडून. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही दीपिका म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तर नाही. मात्र विराटला प्रेरणा देणारी ही दीपिका आहे भारतीय महिला स्क्वॉश खेळाडू. दीपिका पल्लीकल हिचा सराव आणि फिटनेसपाहून विराट कोहली आकर्षित झाला होता. शंकर बसू यांनी एका मुलाखतीत, “विराट नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो. मात्र विराटला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रवृत्त केले ते दीपिका पल्लीकलनं”, असे सांगितले.

वाचा-रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शंकर बासू यांनी, “आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन-तीन हंगामात आम्ही उन्हाळ्यात प्रशिक्षण घ्यायचो. यानंतर एकदा विराट कोहलीने दीपिका पल्लीकलला सराव करताना पाहिले. त्यानंतर विराच दीपिकाकडून खूप प्रेरित झाला. वैयक्तिक खेळात दीपिकाची तंदुरुस्ती पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी असे सुचवले की आपण या मार्गाने प्रशिक्षण का घेऊ शकत नाही”, असे सांगितले. दरम्यान, विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जात असला तरी सुधारण्यासाठी काही तरी जागा असल्याचेही मत शंकरांनी व्यक्त केले.

वाचा-याला म्हणतात जेंटलमॅन! मैदानात कोसळला फलंदाज, गोलंदाजाच्या हातात होता चेंडू पण..

‘फिटनेससाठी विराट काहीही करू शकतो’

विराट कोहलीबद्दल शंकर बसू म्हणाले की, “स्वत: ला सुधारण्यासाठी विराट कोणतीही कसर सोडत नाही. तरी मला वाटते की तो स्वत: ला आणखी सुधारू शकतो. विराटला माहित आहे की फिटनेसची सर्वोत्तम पातळी काय असू शकते. मी त्याला नेहमीच सांगितले की नोवाक जोकोविच आणि उसेन बोल्ट हे त्याचे आदर्श असले पाहिजेत. विराटने जाण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा असून फिटनेस यात सर्वात मोठी भूमिका असू शकते”. शंकर बसू यांनी भारतीय खेळाडूंच्या फिटनेसमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. मात्र बीसीसीआयसोबत त्यांचा करार संपल्यामुळं त्यांना संघाची साथ सोडावी लागली. असे असले तरी, शंकर आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघासाठी काम करतात.

वाचा-टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 05:13 PM IST

ताज्या बातम्या