Cannes 2019 – रेड कार्पेट सोडून प्रियांकाचा ड्रेस निट करण्यात निक जोनस बिझी

कार्यक्रमादरम्यान, प्रियांका आणि निकने त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक फोटो काढले. पण त्याचवेळी प्रियांकाच्या ड्रेसची घडी बिघडलेली निकला दिसली.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 04:03 PM IST

Cannes 2019 – रेड कार्पेट सोडून प्रियांकाचा ड्रेस निट करण्यात निक जोनस बिझी

मुंबई, 18 मे- प्रियांका चोप्राने यंदाच्या वर्षी पहिल्यांदा कान चित्रपट महोत्सवात एण्ट्री घेतली. पहिल्या दिवसापासूनच प्रियांकाच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर चर्चा झाली. पहिल्या दिवशी प्रियांका कानमध्ये एकटीच आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी प्रियांकासोबत तिचा नवरा निक जोनसही होता. कान चित्रपट महोत्सवातील एका कार्यक्रमासाठी प्रियांका आणि निक एकत्र गेले होते. या खास कार्यक्रमासाठी प्रियांकाने लवेंडर रंगाचा फिश स्केलसारखा ड्रेस घातला होता. यावेळी तिच्यासोबत निकही होता.


निकने काळ्या सूटला प्राधान्य दिलं. कार्यक्रमादरम्यान, प्रियांका आणि निकने त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक फोटो काढले. पण त्याचवेळी प्रियांकाच्या ड्रेसची घडी बिघडलेली निकला दिसली. प्रियांका निककडे वळली आणि निकनेही लगेच तिचा ड्रेस निट केला. हा सर्व रोमँटिक प्रकार मोबाइलमध्ये कैद झाला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.


निक आणि प्रियांकाचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात ते आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहेत. याआधी प्रियांकाने काळ्या रंगाचा शिमरचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती फार हॉट दिसत होती.

Loading...

SPECIAL REPORT: चॅटिंग की फोन...मृण्मयी देशपांडेला सगळ्यात जास्त काय आवडतं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...