Cannes 2019 – रेड कार्पेटआधीच मल्लिका शेरावतने दाखवली तिच्या लुकची झलक

Cannes 2019 – रेड कार्पेटआधीच मल्लिका शेरावतने दाखवली तिच्या लुकची झलक

गेली अनेक वर्ष मल्लिका कान महोत्सवाला आवर्जुन उपस्थिती लावत आहे. दरवर्षी ती आपल्या स्टाइलने आणि हटके अंदाजाने लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरते.

  • Share this:

एकीकडे सोशल मीडियावर दीपिका पादुकोण, कंगना रणौत आणि प्रियांका चोप्राचे कान चित्रपट महोत्सवातले फोटो व्हायरल होत असताना मल्लिका शेरावत तरी या शर्यतीत कशी मागे राहील. गेली अनेक वर्ष मल्लिका कान महोत्सवाला आवर्जुन उपस्थिती लावत आहे. दरवर्षी ती आपल्या स्टाइलने आणि हटके अंदाजाने लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरते. यावर्षीही ती आपला कित्ती गिरवेल यात काही शंका नाही.

त्याआधी तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून यंदाच्या कान महोत्सवाला ती कोणत्या ड्रेसला प्राधान्य देणार आहे याची झलक दिली आहे. स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करताना तिने ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू’ असं कॅप्शनही दिलं. या व्हिडिओमध्ये ती फिकट निळ्या रंगाचा गाउन घालून रॅम्पवर चालण्याचा सराव करताना दिसत आहे. या गाउनमध्ये मल्लिका फार सुंदर दिसते यात काही शंका नाही. अगदी थोड्या वेळातच तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अरे देवा! पासपोर्ट होल्डरसाठीही एवढे पैसे खर्च करते दीपिका पादुकोण?
 

View this post on Instagram
 

Preparations begin for the Cannes film festival @tonywardcouture @festivaldecannes @virginiecorrecommunication #cannesfilmfestival #cannes #mondaymood #fashion #hautecouture


A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

यंदाच्या वर्षी टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पहिल्यांदा कान महोत्सवात सहभागी झाल्या. यांच्याशिवाय कंगना रणौत, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय- बच्चन अनेक वर्षांपासून या महोत्सवाला आवर्जुन उपस्थिती लावत आहेत.

Cannes 2019 – साडीनंतर कंगनाचा हॉट पार्टी लुकही व्हायरल

यात ऐश्वर्या राय- बच्चन ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिला अनेक वर्षांपासून कान महोत्सवात जाण्याचा मान मिळत आहे. त्यामुळेच सर्वात जास्त चर्चा ही तिच्या येण्याचीच असते. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ७२ वे वर्ष आहे. या महोत्सवात जगभरातून अनेक कलाकार रेड कार्पेटवर स्वत:ला एकदम हटके अंदाजात सादर करण्याचा सतत प्रयत्न करतात.

दिशा पटानीसाठी टायगर श्रॉफनं ठेवलं 'SOTY 2'चं स्पेशल स्क्रिनिंग

SPECIAL REPORT : मग, तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा का घेतली नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या