ओटावा, 30 जानेवारी : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना डोपिंग टेस्ट देणे बंधनकारक असते. मात्र यात अंमली पदार्थांचे सेवन एखाद्या खेळाडूने केले असेल तर डोपिंग टेस्टमध्ये खेळाडू नापास होतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर होतो. मात्र नुकत्याच एका धक्कादायक प्रकारामुळं संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ माजली.
कॅनडाच्या 11 वेळा जगातील विजेते कॅनोइस्ट लॉरेन्स व्हिन्सेंट लॅपोइन्टे ही डोपिंग टेस्टमध्ये नापास झाल्याचे आढळून आले. तपासणी दरम्यान तिच्या शरिरात अंमली पदार्थ आढळून आले होते. मात्र तपास केल्यानंतर तिच्या शरीरात माजी प्रियकरासोबत लैंगिक संबंधातून प्रतिबंधित पदार्थ शिरले, असा खुलासा झाला. त्यानंतर कॅनोइस्ट लॉरेन्सवरची बंदी हटवण्यात आली आहे.
वाचा-7 वर्ष 182 तरुणींसोबत संभोग करून तयार केले MMS! उद्योगतींच्या मुलांना अटक
गेल्या वर्षी जुलैच्या आंतरराष्ट्रीय कॅनो फेडरेशनच्या (ICF) कॅनो स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पूर्वसंध्येला मादक द्रव्यांच्या चाचणीत अयशस्वी झालेल्या 27 वर्षीय खेळाडूला चार वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर तिला जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही मुकावे लागले असते.
वाचा-काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात
Début de la conférence de presse Laurence Vincent Lapointe. Tout sourire étant blanchis. Très heureuse de la décision de la Fédération internationale. pic.twitter.com/QnoJYwoQ2p
— André Beauchesne (@ABeauchesneRDS) January 27, 2020
मात्र, तिने आपल्या शरीराची तपासणी केल्यानतर स्टिरॉइड सारख्या पदार्थाच्या लिगॅंड्रॉलचा शोध लागला. हा पदार्थ तिने सेवन केला नव्हता तर तिच्या प्रियकरामार्फत तिच्या शरिरात आला होता. त्यामुळं आता या चॅम्पियन खेळाडूची शिक्षा टळली आहे.
वाचा-पाळीव कुत्र्याने चिमुरड्याचा पकडला पाय, जमावाने काठी दगडांने बेदम मारलं पण..
व्हिन्सेंट लॅपोइन्टे यांचे वकील अॅडम क्लेव्हिनास यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की हा सगळा आश्चर्यकारक आहे. तसेच, "निकाल लागण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला आणि शेवटी आम्हाला यश मिळाले”, असे सांगितले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ICFने कॅनोइस्टने सादर केलेले पुरावे स्वीकारले असून तिच्यावर लादलेली बंदी मागे घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.