मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे..! Canada PM जस्टीन ट्रुडो यांनी पोस्ट केला पत्नीला किस करतानाचा फोटो

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे..! Canada PM जस्टीन ट्रुडो यांनी पोस्ट केला पत्नीला किस करतानाचा फोटो

Justin Trudeau and wife Kiss : लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्नी सोफीबरोबर किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी अशाप्रकारे खुलेआम प्रेम व्यक्त केल्यानं सोशल मीडियावर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

टोरंटो, 29 मे : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Canada prime minister Justin Trudeau) यांनी त्यांच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची प्रचंड चर्चा आहे. ट्रुडो यांनी त्यांच्या पत्नी सोफी यांना किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर (Justin Trudeau posted photo kissing wife) शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझा प्रत्येक दिवस प्रचंड उत्हासाचा ठरो, असा संदेश त्यांनी हा फोटो पोस्ट करताना लिहिला.

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या फोटोवर काही वेळातच हजारो प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याला हजारो लोकांनी रिट्विटही केलं आहे. 49 वर्षीय जस्टीन ट्रुडो आणि त्यांच्या 46 वर्षीय पत्नी सोफी हे दोघं सर्वप्रथम कॅनडाच्या मोंट्रियल शहरात भेटले होते.  याठिकाणी सोफी जस्टीन ट्रुडो यांच्या लहान भावाच्या वर्गात शिकत होत्या.

(वाचा-कोरोनाने हिरावलं आईबाबांचं छत्र; कोविडमुळे अनाथ मुलांसाठी मोदी सरकार बनलं मायबाप)

2005 मध्ये केलं लग्न

2003 मध्ये जस्टीन आणि सोफी पुन्हा एकदा एका चॅरीटी सोहळ्यामध्ये भेटले होते. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर 2005 मध्ये ट्रुडो यांनी मोंट्रियलमध्ये सोफी यांच्याबरोबर लग्न केलं. या कपलला तीन मुलं आहेत. लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी ट्रुडो अनेकदा सोफी यांच्यावर असलेलं त्यांचं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करत असतात.

(वाचा-Vasai : पोलिस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, टाटांशी संबंध असल्याच्या करायचा बाता)

सोफी या पेशानं आधी टिव्ही अँकर होत्या. सध्या त्या चॅरीटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. विशेषतः लहान मुले आणि महिलांच्या समस्यांवर त्या काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक गाणंही गायलं होतं. त्याची खूप चर्चा झाली होती. या प्रसिद्ध कपलचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर होत असतात. त्यात अ‍ॅनिव्हर्सरीला त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो तर सोशल मीडियावर सध्या प्रचंडच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Canada, International