कोडं सुटणार?, 'गणित ऐच्छिक विषय होईल का' हायकोर्टाचा सवाल

कोडं सुटणार?, 'गणित ऐच्छिक विषय होईल का' हायकोर्टाचा सवाल

एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडे उत्तर मागितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.

  • Share this:

20 जून : गणित विषयामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षेची गणितं बिघडतात. आता मात्र, राज्य सरकारला ही गणितावर विचार करावा लागणार आहे. गणित हा विषय ऐच्छिक करण्याबाबत आता हायकोर्टाने राज्य सरकारलाच विचारणा केली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडे उत्तर मागितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.

याचिकेवरील सुनावणीत, १९७५ सालापर्यंत दहावीला ८ विषयांपैकी एका विषयात विद्यार्थी अनुतीर्ण असल्यास त्याला उत्तीर्ण केले जात असे. त्या विषयात गणिताचाही समावेश असल्याची बाब हायकोर्टाने नमूद केली. त्याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेतील शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला गणिताचा काय फायदा असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला.

गणित विषय ऐच्छिक करण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले.इतर विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात संथ असणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या लहान वयातच ओळखून त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. राज्यभरातील सर्व शाळा कॉलेज तसेच शिक्षण संस्थांनी एक विशेष मोहीम राबवून अशा विशेष विद्यार्थ्यांना शोधून काढावे आणि त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 08:58 AM IST

ताज्या बातम्या