मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /वांद्रे वरळी सी लिंकच्या समुद्रात कॅमेरे लावता येतील का ?,कोर्टाकडून विचारणा

वांद्रे वरळी सी लिंकच्या समुद्रात कॅमेरे लावता येतील का ?,कोर्टाकडून विचारणा

एमएसआरडीसी यावर उत्तर देताना सी लिंकची सुरक्षितता वाढवण्यात आली असून ८६ सीसीटीव्ही आणि कायम स्वरुपी ३० सुरक्षा रक्षक आहेत अशी माहिती कोर्टाला दिली.

     28 फेब्रुवारी : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने तेथील समुद्राच्या पाण्यात कॅमेरे लावता येतील का याबद्दल केंद्र सरकार आणि कोस्ट गार्डचं मत मुंबई हायकोर्टाने मागितलं आहे.

    वांद्रे वरळी सी लिंकच्या भागातील सुरक्षा वाढवण्यात यावी तसंच आत्महत्या आणि इतर गुन्हे होऊ नयेत याकरता कॅमेरांचा वापर सीसीटीव्ही आणि पाण्यातील कॅमेरे बसवण्यात यावेत तसंच सी लिंकच्या ४.८ किलोमीटरच्या परिसरात बाॅम्ब डिटेक्टर्स लावण्यात यावेत, तसंच अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेतन अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने केंद्र सरकार आणि कोस्ट गार्ड यांना उत्तर मागितलं आहे.

    एमएसआरडीसी यावर उत्तर देताना सी लिंकची सुरक्षितता वाढवण्यात आली असून ८६ सीसीटीव्ही आणि कायम स्वरुपी ३० सुरक्षा रक्षक आहेत अशी माहिती कोर्टाला दिली. आणि बाँब डिटेक्शनसाठी लागणारे एक्स रे स्कॅनर्स त्यात प्रवासी असताना कायद्याप्रमाणे वापरता येत नसल्याची माहिती एमएसआरडीसीनं कोर्टाला दिली.

    कोर्टाने चार आठवड्यात केंद्र सरकार आणि कोस्ट गार्ड यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Mumbai high court