Home /News /news /

'ड्रीम गर्ल' बनून करायचा फोन, पैसे घेऊन बोलवायचा आणि...

'ड्रीम गर्ल' बनून करायचा फोन, पैसे घेऊन बोलवायचा आणि...

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारचे एकूण २२ गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे

वसई, 11 मार्च : चोर चोरी करण्यासाठी काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा आवाज काढून लुटणाऱ्या आरोपीला  पोलिसांनी बेड्या ठोकल्या  आहे. या आरोपीकडून ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाआहे. "मी डॉक्टर बोलतेय..." असा आवाज काढून आरोपी मनिष शशीकांत आंबेकर (वय 42) लोकांना लुटत होता.  मनिष महिलेचा आवाज  काढून ज्वेलर्स दुकानदार, मेडिकल दुकानदार यांना फोन करायचा. त्यासाठी मार्केटमध्ये फिरून दुकानावरील  बोर्डवरील नाव आणि नंबर गोळा करायचा. त्यानंतर तो महिलेच्या आवाजात दुकानदारांना फोन करायचा. फोन केल्यानंतर  जवळच्या हॉस्पिटलचे नाव सांगून लाखो रूपये  सुट्टे देण्यासासाठी मागवायचा.  दुकानदार पैसे द्यायला आल्यावर "तुम्ही ज्वेलर्समधून आलात ना, ते पैसे माझ्याकडे द्या आणि मॅडमकडून सुट्टे पैसे घ्या", असं सांगून पैसे घेवून पसार व्हायचा. मनिष आंबेकर याने दोन महिलांसोबत लग्न केलं आहे. हौस भागवण्यासाठी त्याने महिलेचा आवाज काढून लुटण्याचा प्रकार सुरू केला होता.  मनिष हा नालासोपारा येथील बायकोला भेटायला येणार असल्याचं माणिकपूर पोलिसांना समजल्यावर त्यांनी सापळा रचून अटक केली. त्याने अशाच प्रकारचे पालघर जिल्ह्यातील माणिकपूर,  डहाणू , कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसंच ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाणे आणि नाशिक रोड अशा पोलीस ठाण्याचे हद्दीतील मेडीकल दुकानदार, ज्वेलर्स दुकानदार तसंच किराणा मालाचे होलसेल व्यापारांना गंडा घातला. एवढंच नाहीतर पालघर जिल्ह्यातील ७ गुन्हे उघड झाले असून यापूर्वी त्याच्यावर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या भांडुप, दहीसर, गोरेगाव पोलीस ठाणे तसंच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वागळे ईस्टेट, कळवा, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केले आहे. मनिषने ठाणे,पालघर पाठोपाठ नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारचे एकूण २२ गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Vasai, Vasai crime, Vasai police

पुढील बातम्या