Home /News /news /

कोण आहे खरा Binod? अनामिक फ्रेंच हॅकर्सच्या ट्वीटने खळबळ

कोण आहे खरा Binod? अनामिक फ्रेंच हॅकर्सच्या ट्वीटने खळबळ

सध्या सोशल मीडियावर Binod ट्रेंड होतो आहे. बिनोदचं नाव चर्चेत आहे, मात्र तो आहे कोण हे कुणाला माहिती नाही.

    मुंबई, 10 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर बिनोद (Binod) नावाची चर्चा सुरू आहे. जिथं पाहावं तिथं बिनोद, बिनोद आणि फक्त बिनोद. यावरून इंटरनेटवर मीम्स व्हायरल होऊ लागते आहे. फेसबुक, ट्वीटर, युट्युवर प्रत्येक जण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये बिनोद लिहून पोस्ट करतो आहे. इतकंच नव्हे तर अनेक कंपन्या आणि अगदी पोलिसांनाही बिनोदवर कमेंट केली आहे. मात्र हा बिनोद नेमका आहे तरी कोण? बिनोदची सुरुवात झाली ती एका युट्युब चॅनेलच्या प्रतिक्रियेवरून. स्ले पॉइंट या यु ट्युब चॅनेलने आपल्या चॅनेलच्या कमेंट सेक्शनवर एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये बिनोद या कमेंटचा उल्लेख होता. Why indian comment section is garbage असं या युट्युबचं नाव होतं. ज्यामध्ये बिनोद थारू नावाच्या व्यक्तीने कमेंट सेक्शनमध्ये आपलं नाव बिनोद लिहिलं होतं. त्यानंतर बिनोद ट्रेंड होऊ लागला. दरम्यान आता एका अनामिक फ्रेंच हॅकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉल मी बिनोद असं ट्वीट त्याने केलं आहे. एलिएट एल्डरसनच्या या ट्वीटमुळे आता खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या ट्वीटरचं नावही बदललं आहे. यामुळे त्याचं भारताशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. इतकंच नाही तर त्याने एका भारतीयाने त्याला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. ही व्यक्ती त्याच्याकडे आधार कार्ड बनवण्यासाठी मदत मागते आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही व्यक्ती आपल्याला मेसेज पाठवत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. जॉनी वेंकट असं या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती कोण आहे माहिती नाही. मात्र त्याच्या प्रोफाइलवर दलकीर सलमान या भारतीय अभिनेत्याचा फोटो आहे. ही व्यक्ती एका हॅकर्सला मेसेज का करते आहे माहिती नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media trends

    पुढील बातम्या