सिनेमातला सीन नाही तर...! चहूबाजूंनी आगीनं वेढलेल्या जंगलातून जवानानं चालवली गाडी, पाहा थरारक VIDEO

सिनेमातला सीन नाही तर...! चहूबाजूंनी आगीनं वेढलेल्या जंगलातून जवानानं चालवली गाडी, पाहा थरारक VIDEO

रस्त्याच्या दुतर्फा आग आणि किटाळ उडत आहे, रौद्र रुप धारण केलेल्या आगीचे लोळ अंगावर येत असतानाही जीव धोक्यात घालून जवानानं गाडी चालवली आहे.

  • Share this:

सॅन फ्रान्सिसको, 04 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटाच नाही तर काळजातही धस्स होतं. रस्त्याच्या दुतर्फा आग आणि किटाळ उडत आहे, रौद्र रुप धारण केलेल्या आगीचे लोळ अंगावर येत असतानाही जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान लोकांचा आणि प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियाच्या जंगलामधील असल्याचं माहिती मिळाली आहे.

अमेरिकेत एकीकडे निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच कॅलिफोर्नियामील जंगलात आगीनं रौद्र रुप धारण केलं आहे. चार एकरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झाल्यामुळे आता लोकांना आणि तिथल्या प्राणीमात्रांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-आता तर हद्दच झाली! घोड्यानं चक्क नाकाने वाजवला पियानो, पाहा VIDEO

CNNनं दिलेल्या वृत्तानुसार 27 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं आग वेगानं पसरत गेली आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य होत गेलं. 2 हजार 600 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. शुक्रवारपासून 48 किमी प्रतितास वेगानं हवा सुरू असल्यानं आणखीन रौद्र रूप धारण करणं अनेक घरं, इमारती आणि जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. संपूर्ण परिसर जळून खाक झाला आहे.

4 एकरातील जवळपास 31 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून वन्यपक्षी आणि प्राण्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर अनेक घरं देखील जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून कशा पद्धतीनं काम करतात हे या व्हिडीओमधून दिसत आहे. कॉलिफोर्नियातील हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 4, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या