News18 Lokmat

या व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलला 60 वर्षे जुना नियम

Cabinet Secretary : नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेच सचिव पदासाठी 60 वर्षे जुना नियम बदलला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 10:36 AM IST

या व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलला 60 वर्षे जुना नियम

नवी दिल्ली, 09 जून : केंद्र सरकारनं कॅबिनेट सचिव पदासाठी 60 वर्षे जुना नियम बदलला आहे. कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना 3 महिन्यांची मुदत वाढ देण्यासाठी 60 वर्षे जुना नियम बदलला आहे. कॅबिनेट सचिव पदाचा कार्यकाळ 2 वर्षापर्यंत असतो. 1958च्या नियमानुसार सरकार कॅबिनेट सचिवांना सेवा वाढ देऊ शकते. पण, त्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षापेक्षा जास्त नसावा. प्रदीप कुमार सिन्हा आपला 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. पण, मोदी सरकारनं हा नियम बदलला आहे.

नव्या नियमानुसार केंद्र सरकार 4 वर्षानंतर कॅबिनेट सचिवांना किमान 3 महिन्यांपर्यंत कार्य विस्तार देऊ शकते. त्यानुसार आता कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना 3 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीप कुमार सिन्हा आता कॅबिनेट सचिव पदावर सर्वात जास्त काळ काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातील.


VIDEO : कोलकात्यात टीएमसी कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

महत्त्वाचं पद

Loading...

कॅबिनेट सचिव हे नोकरशाहीतील सर्वात महत्त्वाचं पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचं असं हे पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि कॅबिनेट सचिव यांच्याकडे पीएमओमधील सर्वात प्रभावशाली टीम म्हणून पाहिलं जातं. प्रदीप कुमार सिन्हा यांना तिसऱ्यांदा सेवा वाढ देण्यात आली आहे.

2017 ते 2018 या काळात सिन्हा यांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला. सिन्हा यांना 2015मध्ये कॅबिनेट सचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.


अलिगढ हत्याकांड : आरोपींनी खून करून फ्रिजमध्ये ठेवला चिमुरडीचा मृतदेह

3 महिन्यानंतर कोण असणार सिन्हांच्या जागी

प्रदीप कुमार सिन्हा यांच्या जागी 3 महिन्यानंतर केंद्रीय गृहसचिव राजीव गाबा यांची नियुक्ती होऊ शकते. गाबा यांनी केंद्र सरकराच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. बिहार आणि झारखंडमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. 31 ऑगस्ट रोजी सिन्हा यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती होणार आहे.

कोण आहेत गाबा

राजीव गाबा हे 1982च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. नियुक्तीनंतर पुढील दोन वर्षांसाठी गाबा या पदावर असतील.


मद्यधुंद तरुणाची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...