S M L

मोदींच्या मंत्रिमंडळाची 'नऊ'लाई, हे आहे नवे 9 चेहरे

मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 9 जणांना संधी दिली जाणार आहे. यात ३ राज्यमंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ९ नव्या मंत्र्यांपैकी ४ माजी सरकारी अधिकारी असणार आहे. सकाळी 10.30 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू होणार आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2017 11:14 AM IST

मोदींच्या मंत्रिमंडळाची 'नऊ'लाई, हे आहे नवे 9 चेहरे

s

03 सप्टेंबर : आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 9 जणांना संधी दिली जाणार आहे. यात ३ राज्यमंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ९ नव्या मंत्र्यांपैकी ४ माजी सरकारी अधिकारी असणार आहे. सकाळी 10.30 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू होणार आहे.

या विस्तारात बिहारचे माजी मंत्री आणि बिहारचे ब्राम्हण नेता अश्विनी चौबे, उत्तर प्रदेशच्या गोरखपुरचे शिव प्रताप शुक्ला, मध्यप्रदेशातील दलित चेहरा वीरेंद्र कुमार ,कर्नाटका मधून 5 वेळा निवडून आलेले अनंत कुमार हेगडे, विदेश सेवतील निवृत्त अधिकारी आणि माजी एम्बेसेडर हरदीप सिंह पूरी, राजस्थान मधील जोधपुरचे खासदार गजेंद्र शेखावत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेशातील जाट चेहरा सत्यपाल सिंह, माजी गृह सचिव आर के सिंह, माजी सनदी अधिकारी आणि केरल मधून येणारे अल्फोंस कांनाथनाम यांचा समावेश आहे. तर निर्मला सीतारमण यांना बढती मिळणार आहे.



सरकारमधल्या नव्या चेहऱ्यांचा थोडक्यात परिचय

शिवप्रसाद शुक्ला

- उत्तर प्रदेशमधले राज्यसभेचे खासदार

Loading...

- संसदीय ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य

- ४ वेळा आमदार

- १९७०च्या दशकात विद्यार्थी राजकारणापासून सुरुवात

- अश्विनी कुमार चौबे

- बिहारमधल्या बक्सरचे लोकसभा खासदार

- बिहार विधानसभेत सलग 5 वेळा आमदार

- बिहारमध्ये आरोग्य, नगरविकास खात्याचे मंत्री होते

- जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रिय होते

वीरेंद्र कुमार

- मध्य प्रदेशच्या टिकमघरमधून लोकसभा खासदार

- सलग ६ वेळा लोकसभा खासदार

- जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय

- सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव

अनंतकुमार हेगडे

- कर्नाटकातल्या उत्तर कन्नडामधून खासदार

- 28व्या वर्षी लोकसभा खासदार

- ग्रामीण प्रश्नांचा गाढा अभ्यास

- कोरियन मार्शल आर्टमध्ये प्राविण्य

राजकुमार सिंह

- बिहारच्या आराहमधून लोकसभा खासदार

- अनेक संसदीय समितींचे सदस्य

- माजी सनदी अधिकारी

- माजी केंद्रीय गृह सचिव

- हरदीपसिंग पुरी

- १९७४ बॅचचे आयएफएस अधिकारी

- राष्ट्रीय सुरक्षा या विषयातले तज्ज्ञ

- RAIFSDC या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष  

- न्यूयार्कच्या इंटरनॅशनल पीस इन्स्टीट्यूटचे माजी अध्यक्ष

- गजेंद्र सिंह शेखावत

- जोधपूरचे लोकसभा खासदार

- संसदीय अर्थ स्थायी समितीचे सदस्य

- साध्या राहणीसाठी प्रसिद्ध

-सत्यपाल सिंग

- उत्तर प्रदेशच्या बागपतचे लोकसभा खासदार

- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त

- २०१४मध्ये पहिल्यांदा खासदार

- अल्फान्सो कन्ननथानम

- 1979च्या बॅचचे आएएस अधिकारी

- दिल्लीत 'डीमॉलिशन' मॅन म्हणून ओळख होती

- अनेक स्वयंसेवी संस्था चालवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 08:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close